---Advertisement---

ए आर रहमान यांनी एमएस धोनी आणि सुरेश रैना ‘ही’ गाणी केली समर्पित, कारणही सांगितले

On: शुक्रवार, एप्रिल 16, 2021 8:15 PM
---Advertisement---

भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश म्हणून ओळखला जातो. अनेक क्रिकेट व्यतिरिक्त क्षेत्रातील मोठे सेलिब्रेटीही क्रिकेटला फॉलो करताना दिसतात. आता तर ऑस्कर पुरस्कार विजेते गायक आणि संगीतकार एआर रहमान यांनी त्यांचे प्रसिद्ध गाणे एमएस धोनी आणि सुरेश रैना या भारताच्या माजी क्रिकेटपटूंना समर्पित केले आहे.

सध्या भारतात इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगाम सुरु आहे. या हंगामात धोनी आणि रैना चेन्नईकडून खेळत आहेत. या हंगामादरम्यान, स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या क्रिकेट लाईव्ह शोमध्ये रेहमान यांनी त्यांचे ‘चला चलो’ हे लगान चित्रपटातील गाणे चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला समर्पित केले आहे. याचसोबत त्याने रंगीला चित्रपटाचे ‘मंगता है क्या’ हे गाणे सीएसके संघाचा खेळाडू सुरेश रैना याला समर्पित केले आहे.

रहमान यांनी शोवेळी म्हटले आहे की, “लगान या चित्रपटाचे ‘चले चलो’ हे गाणे धोनीला समर्पित करत आहे, कारण धोनी सर्वांना मिळून मिसळून क्रिकेट खेळायला प्रोत्साहित करतो.” रहमान यांनी पुढे सांगितले की, ‘मंगता है क्या’ हे गाणे सुरेश रैनाला समर्पित करतो, कारण मी जेव्हा जेव्हा बंगळूरला जात असे तेव्हा तेव्हा मी रैनाला रंगीला चित्रपटातील गाणे बऱ्याच वेळा ऐकताना पहिले आहे.

रहमानच्या आधी या शोमध्ये गौतम गंभीर देखील आला होता. गंभीरने  धोनीबद्दल म्हटले होते की, त्याने वरच्या फळीमध्ये फलंदाजीला यायला हवे. धोनी जर वरच्या फळीत खेळायला आला तर तो चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना नेतृत्व करू शकतो. जेव्हा धोनी सातव्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करतो तेव्हा तो पुढे होऊन नेतृत्व करू शकत नाही.

धोनीच्या मार्गदर्शनाखाली असणारा चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल मधील सर्वात समतोल संघ समजला जातो.पण मागच्या वर्षी चेन्नई सुपर किंग्स संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग संघाला पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून सात गड्यांनी पराभव स्विकारावा लागला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ खेळाडूला आगामी सामन्यांमध्ये मिळणार नाही हैदराबाद संघात जागा, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी

ख्रिस गेलचा झेल बेन स्टोक्सला पडलाय भलताच महाग; आता तब्बल ‘इतके’ आठवडे राहाणार क्रिकेटपासून दूर

भारीच ना! एबी डिविलियर्सने त्याच्या पत्नीला भारतातील ‘या’ प्रसिद्ध ठिकाणी केले होते प्रपोज, पत्नीनेच केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---