---Advertisement---

भारीच ना! एबी डिविलियर्सने त्याच्या पत्नीला भारतातील ‘या’ प्रसिद्ध ठिकाणी केले होते प्रपोज, पत्नीनेच केला खुलासा

On: शुक्रवार, एप्रिल 16, 2021 5:55 PM
---Advertisement---

भारतात एबी डिविलियर्सचे असंख्य चाहते आहेत. तसेच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. एबी डिविलियर्स सध्या आयपीएल खेळण्यात व्यस्त आहे. त्याची पत्नी डॅनिएलही यंदा त्याच्यासह भारतात आहे. डॅनिएल ही सोशल मीडियावर इतकी सक्रिय नसते. तिने पहिल्यांदा सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले आहे.

डॅनियएने नुकतेच आपल्या विवाहाबद्दल खुलासा केले आहे. इंस्टाग्रामवर प्रश्न उत्तरांच्या सत्रामध्ये तिला एका चाहत्याने विचारले होते की, “तुमचे अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? जर लव्ह मॅरेज होते तर आधी लग्नाची मागणी कोणी घातली आणि कुठे घातली होती?’

या प्रश्चांचे उत्तर देत तिने म्हटले की, “मला या बाबतीत खूप सारे प्रश्न विचारण्यात आले आहेत. आमचं अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. एबीने मला भारतात, ताजमहलसमोर लग्नाची मागणी घातली होती. ”

एबी डिविलियर्स आणि डॅनिएल हे २०१३ सालामध्ये विवाह बंधनात अडकले होते. तसेच एबी डिविलियर्स सध्या भारतात आहे आणि तो आयपीएल स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी खेळताना त्याने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सलामीच्या सामन्यात तुफानी ४८ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केले होते.

तसेच एबी डिविलियर्सला आता ग्लेन मॅक्सवेलची देखील चांगली साथ मिळत आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा पुढील सामना १८ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध असणार आहे. या सामन्यात देखील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला एबी डिविलियर्सकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

एकट्या रोहितच्या वेतनात भागतो साऱ्या पाकिस्‍तानी क्रिकेटपटूंचा पगार, वाचा सविस्तर

‘थाला’च्या पलटणला पहिल्या विजयाची आस; ‘अशी’ असेल चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जची प्लेइंग इलेव्हन?

“तू आता जास्त आक्रमक नाही राहिला, त्यामुळे…” पंजाबविरुद्धच्या लढतीपुर्वी गंभीरने धोनीला दिले ज्ञान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---