भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याने आपल्या फलंदाजी कामगिरीने ‘द वॉल’ अशी उपाधी मिळवली आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर प्रशिक्षक म्हणूनही त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. १९ वर्षांखालील भारतीय संघ, अ दर्जाच्या भारतीय संघांना बरेचसे सामने जिंकून देण्यात देण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला आहे.
आता हाच द्रविड मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत राष्ट्रीय संघासह श्रीलंका दौऱ्यावर गेल्यावर गेला आहे. त्याच्या देखरेखीखाली १३ जुलैपासून भारत श्रीलंकेशी दोन हात करणार आहे. तत्पुर्वी श्रीलंकेचा माजी फलंदाज अरविंद डी सिल्वा याने त्याचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
द्रविडमुळे भारतीय संघाला शुबमन गिल, पृथ्वी शॉ, मयंक अगरवालसारखे प्रतिभाशाली क्रिकेटपटू गवसले असल्याचे डी सिल्वाने म्हटले आहे. द टेलिग्राफशी बोलताना डि सिल्वा म्हणाला की, “१९ वर्षांखालील क्रिकेट हा आपला पाया आहे. जर पाया मजबूत असेल तर त्याची जडणघडण करणे खूप सोपे जाते. कारण त्या वयात क्रिकेटपटू शिस्त, क्रिकेट संबंधी आवश्यक ज्ञान आणि रणनितींविषयी शकतो. त्यामुळे जर तुमच्याकडे (भारतीय क्रिकेटकडे) पाया मजबूत करण्यासाठीच द्रविडसारखी व्यक्ती असेल तर दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही.”
“द्रविड स्वत: एक शिस्तप्रिय व्यक्ती आहे. त्याचा परिणाम कमी वयात द्रविडकडून प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंवर होतो. निश्चितपणे कोणासाठीही हे फायद्याचे ठरते जेव्हा की, त्यांच्या जिवनातील नायकच त्यांचा प्रशिक्षक बनतो. यामुळे कोणालाही पुढे जाण्यात आणि आपली कारकिर्द घडवण्यात मदत मिळते,” असेही त्याने सांगितले.
याबरोबरच द्रविडमुळे श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेला त्याच्यासारखी भूमिका निभावण्यासाठी प्रेरणा मिळाली असल्याचेही डि सिल्वाने सांगितले. तो म्हणाला की, “मी जयवर्धनेला १९ वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक बनवण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु मी त्याला यासाठी तयार करण्यास अपयशी ठरलो. परंतु जेव्हा द्रविडला १९ वर्षांखालील संघाचा प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले, तेव्हा मला खरोखरच खूप बरे वाटले.”
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचे नवे युवराज सिंग! माजी अष्टपैलूला ‘या’ तिघांमध्ये दिसते स्वत:ची छबी
टी२० विश्वचषकावर पुन्हा टांगती तलवार, यंदाही होऊ शकतो रद्द? गांगुलीने दिला इशारा