भारतीय महिला संघ 19 वर्षांखालील संघ टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. रविवारी भारत आणि इंग्लडं महिला संघांमध्ये 19 वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली. स्पर्धेदरम्यान भारतीय कर्णधार, श्वेता सहरावत आणि पार्श्वी चोपडा यांच्याव्यतिरिक्त संघातील इतर खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. संघातील अर्चना देवी हिचा इथपर्यंतचा प्रवास खरोखर सोपा म्हणता येणार नाही.
19 वर्षाखालील भारतीय महिला संघाकडून विश्वचषक खेळणाऱ्या अर्चना देवी (Archana Devi) मुळची उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील आहे. उन्नावच्या एका छोट्या गावात तिचे घर आहे. 18 वर्षी अर्चना एक एक ऑफ स्पिनर गोलंदाज आहे. अर्चना अवघ्या 4 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवर पडली. वडिलांच्या निधनानंतर अर्चनाची आई शेती आणि गाईच्या दूध विकून येणाऱ्या पैशांनी कसाबसा संसार चालवत होती. मात्र, घरखर्चासाठी पुरेसा पैसा यातून मिळत नव्हता. अशात अर्चनाच्या शिक्षणासाठी देखील पैसे खर्च करणे तिच्या आईला परवडणारे नव्हते. अशात आईने अस्तूरबा गांधी निवसी शाळेत अर्चनाचा प्रवेश निश्चित केला. याठिकाणी तिच्या राहण्याची आणि जेवणाची सोय मोफत होत असल्यामुळे हा निर्णय आईने घेतला असल्याचे सांगितले जाते.
आईने आर्थिक अडचणीमुळे घेतलेला हा निर्णय पुढे अर्चनाच्या भविष्यासाठी सर्वात महत्वाचा ठरला. याठिकाणी अर्चनाच्या सुप्तगुणांना वाव मिळाला. कस्तुरबा गांधी शाळेत अर्चनामध्ये लवलेल्या सुप्तगुणांना सर्वात आधी त्यांच्या शारिरिक शिक्षणाच्या शिक्षिकांनी पूनम यांनी पारखले. शाळेत रनिंग करताना पूनम यांना अर्चनामध्ये इथर विद्यार्थिनींपेक्षा काहीतरी वेगळे जाणवले. याच कारणास्तव त्यांनी अर्चनाला क्रिकेट खेळण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली. वयाच्या 13 व्या वर्षी अर्चनाने क्रिकेट शिकण्यासाठी उन्नाव सोडले आणि कानपूरला पोहोचली. याठिकाणी स्वतःच्या क्रिकेट खेळण्याच्या शैलीवर काम केले. कानपूरमध्ये असताना अर्चना अनेकदा फक्त पाण्यासोबत बिस्किट खाऊन मैदानात खेळण्यासाठी उफस्थित होत असायची.
अर्चनाची आई सावित्रीने मुलगी भारतासाठी खेळत असल्यामुळे अश्यर्य वाटत असल्याचे म्हटले. “वेळप्रसंगी कामी न आलेले लोक देखील आता शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत,” असे सावित्री म्हणाली. दरम्यान, अर्चनाने या 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकात आतापर्यंत एकूण 6 विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तिने 20 धावा खर्च करून 1 विकेट घेतली. (Archana Devi, who played for India in the U-19 World Cup final, had a tough childhood)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे क्रिकेट पाहून आता पंचही कंटाळले! दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामन्यातील व्हिडिओ व्हायरल
शॉन पॉलकसारखा अष्टपैलू बनू शकतो ‘हा’ खेळाडू, डिविलियर्सकडून दक्षिण आफ्रिकी युवकाचे कौतुक