अर्जेंटिनाने पुन्हा एकदा फिफा विश्वचषकाच्या FIFA WORLD CUP 2026 फायनलमध्ये धडक मारली आहे. रोमांचक उपांत्य सामन्यात ARGENTINA BEAT ENGLAND BY 2-1 इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून, गतविजेत्या अर्जेंटिनाने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले.
कर्णधार लिओनेल LIONEL MESSI मेस्सीला सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये काहीशा संघर्षाचा सामना करावा लागला असला, तरी त्याने सामन्याच्या अंतिम क्षणी आपल्या जादुई खेळाच्या जोरावर शानदार पुनरागमन केले. आता अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा सामना स्पेनशी होईल; स्पेनने आपल्या उपांत्य सामन्यात फ्रान्सचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे.
पूर्वार्धात मेस्सीकडून प्रतिस्पर्धी संघाकडे 15 वेळा चेंडू गेला. 2018 नंतरच्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेतील त्याची ही सर्वात खराब कामगिरी होती. मात्र, सामन्याच्या अंतिम टप्प्यात प्रचंड दडपण असतानाही, त्याला जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक का मानले जाते, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले.
85व्या मिनिटाला, मेस्सीने दिलेल्या अचूक पासवर एन्झो फर्नांडिसने गोल करत स्कोर 1-1 अशी बरोबरीवर आणली. त्यानंतर सात मिनिटांनी म्हणजेच 90+2व्या मिनिटाला लाउटारो मार्टिनेझनेही मेस्सीच्या पासवर गोल केला. अर्जेंटिनाचा 2-1 असा विजय निश्चित केला. त्याआधी, 55व्या मिनिटाला अँथनी गॉर्डनने गोल करून इंग्लंडला आघाडी मिळवून दिली होती.
दरम्यान, तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत इंग्लंडचा सामना फ्रान्सशी होणार आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेनने फ्रान्सचा 2-0 असा पराभव केला होता.
विश्वचषकात इतिहास घडवण्यापासून अर्जेंटिना आता केवळ एका विजयाच्या अंतरावर आहे. जर अर्जेंटिनाने अंतिम सामन्यात स्पेनचा पराभव केला, तर 1962 मधील ब्राझिलनंतर सलग फिफा विश्वचषक जिंकणारा तो पहिला संघ ठरेल. गेल्या 62 वर्षांत कोणत्याही देशाला आपले विश्वचषक विजेतेपद यशस्वीपणे राखता आलेले नाही.
तथापि, अर्जेंटिनासमोर स्पेनचे तगडे आव्हान असेल, स्पेन हा संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला असून त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे.
अर्जेंटिनाचा आत्मविश्वास केवळ कर्णधार लिओनेल मेस्सीमुळेच नाही, तर संपूर्ण संघाच्या सामूहिक कामगिरीमुळे वाढला आहे. मेस्सीच्या अनुभवासोबतच, युवा खेळाडूंनीही जबाबदारी स्वीकारली असून अत्यंत तणावाच्या क्षणी स्वतःला सिद्ध केले आहे. यामुळे अंतिम सामन्यात विजय मिळवून इतिहास घडवण्याचा अर्जेंटिनाचा निर्धार अधिकच दृढ झाला आहे.






