प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी विवाहबंधनात अडकला आहे. मेस्सीने आपली बालमैत्रिण अँटोनेला रिकुज्जोसोबत विवाह केला आहे.
अर्जेंटिनामधील सिटी सेंटर रोसारियो कॉम्प्लेक्समध्ये पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला क्रीडा तसेच सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. २५० प्रमुख पाहुण्यांमध्ये पॉप स्टार शकिरा, तिचा पती गेरार्ड पिक, मेस्सीचे बार्सिलोना एफसीचे संघ सहकारी लुईस सुआरेझ, नेमार तसेच गेरार्ड यांनीही हजेरी लावली होती.
अर्जेंटिना देशात वेडिंग ऑफ द सेंच्यूरी असा लग्न सोहळा आयोजित होत असल्याची जोरदार चर्चा होती. मेस्सीचे सध्याचे वय ३० असून बालमैत्रीण अँटोनेला रिकुज्जो २९ वर्षांची आहे. मेस्सी १३ वर्षांचा असताना स्पेनला राहायला गेला. त्यापूर्वी त्याची ओळख अँटोनेला रिकुज्जोशी झाली होती.