आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला मात दिली. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात गुजरातने एमएस धोनी याच्या सीएसकेला 5 विकेट्स राखून मात दिली. हा सामना सुरू होण्याआधी आयपीएल 2023 चा उद्घाटन समारंभ दिमाखात पार पडला. याच प्रसंगी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंग याने धोनीविषयी आपल्या मनातील आदर दाखवून दिला. अरिजितने यावेळी थेट धोनीचे पाय धरले.
यावर्षी आयपीएलचा 16 वा हंगाम खेळला जात आहे. या हंगामाच्या उद्घाटनासाठी तमन्ना भाटिया, रश्मिका मंदाना यांच्यासह अरिजित सिंग (Arijit Singh) यानेही लाईव्ह परफॉर्मन्स दिला. हा उद्घाटन सोहळा संपल्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार हार्दिक पंड्या आणि एमएस धोनी यांनी उपस्थिती सेलिब्रिटींची भेट घेतली. एमएस धोनी (MS Dhoni) आणि अरिजित सिंग एकमेकांना जेव्हा भेटले, तो क्षण चाहत्यांच्या मनाला स्पर्श करणारा ठरला. धोनीला भेटल्यानंतर अरिजीत सिंगने भारताच्या या माजी कर्णधाराचे थेट काय पकडले. अरिजित आणि धोनीचे या प्रसंगी टिपलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1641851445153767425?s=20
उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर नाणेफेक जिंकल्यानंतर गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजीला आलेल्या सीएसकेने 20 षटकात 7 बाद 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 19.2 षटकांमध्ये 5बाद 182 धावा केल्या आणि हंगामातील पहिला विजय देखील मिळवला. सिएसकेसाठी पुणेकर ऋतुराज गायकवाड याने 50 चेंडूत 92 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर दुसरीकडे गुजरातसाठी सलामीवीर शुबमन गिल याने सर्वाधिक 63 धावांचे योगदान दिले.
(Arijit Singh fell at the feet of MS Dhoni in the opening serenade)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हेच ते दोन चेंडू, ज्यावर ऋतुराजने पंड्याला दाखवला पुणेरी दणका; खणखणीत षटकाराचा व्हिडिओ व्हायरल
ऋतुराजच्या वादळी 92 धावांची झुंज अपयशी, गुजरातचा पहिल्या सामन्यात दणदणीत विजय






