गुजरात राष्ट्रकुल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू अर्जुन कढे व ऋतुजा भोसले हे अनुक्रमे पुरुष व महिला गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा अहमदाबाद येथील साबरमती फ्रंट टेनिस कॉम्प्लेक्स या ठिकाणी 28 सप्टेंबर ते 5 ऑकटोबर, 2022 या कालावधीत रंगणार आहे.तसेच, विशेष म्हणजे पहिल्यांदाच या स्पर्धेत 14वर्षीय मानस धामणे पदार्पण करत असून पुरुष संघाचा तो एक भाग आहे. याशिवाय 18वर्षांखालील गटातील राष्ट्रीय विजेती वैष्णवी आडकर, कोल्हापूरचा संदेश कुरळे यांचादेखील संघात समावेश करण्यात आला आहे.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, या स्पर्धेसाठी आम्ही आमच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडू यांचे उत्कृष्ट मिश्रण साधले असून त्या माध्यमातून केवळ वर्तमानातीलच नव्हे तर भविष्यातील वाटचालीसाठी एक मजबूत महाराष्ट्राच्या संघाची बांधणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्र संघ सात पैकी सात गटात सहभागी होत असून यामध्ये पुरुष व महिला गट, पुरुष व महिला एकेरी व दुहेरी गट आणि मिश्र दुहेरी गट यांचा समावेश आहे. गतवर्षी केरळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाने चांगली कामगिरी असून 1 रजत आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली होती.
पुरुष संघात अर्जुन कढेसह अन्वित बेंद्रे, मानस धामणे, संदेश कुरळे, अथर्व शर्मा यांचा तर, महिला संघात ऋतुजा भोसले, आकांक्षा नित्तूरे, वैष्णवी आडकर, रुमा गायकैवारी, ईश्वरी माथेरे यांचा समावेश आहे. माजी एटीपी मानांकित खेळाडू व मुंबई येथे सध्या प्रशिक्षक म्हणून काम करत असलेल्या नवदीप सिंग यांची पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी, तर कोल्हापूरच्या शितल भोसले यांची संघाच्या व्यवस्थापकपदी निवड करण्यात आली आहे. महिला संघाच्या प्रशिक्षकपदी पुण्याच्या नमिता बाळ यांची तर हिमांशू गोसावी यांची व्यवस्थापकपदी निवड करण्यात आली आहे. अपूर्वा कुलकर्णी संघाच्या फिजिओ व ट्रॅव्हलचे काम पाहणार आहेत.
संघातील सहभागी खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:
पुरुष संघ: अर्जुन कढे(कर्णधार),अन्वित बेंद्रे, मानस धामणे, संदेश कुरळे, अथर्व शर्मा; व्यवस्थापक: शितल भोसले; प्रशिक्षक: नवदीप सिंग;
महिला संघ: ऋतुजा भोसले(कर्णधार), आकांक्षा नित्तूरे, वैष्णवी आडकर, रुमा गायकैवारी, ईश्वरी माथेरे; व्यवस्थापक: हिमांशू गोसावी; प्रशिक्षक: नमिता बाळ.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया2022 स्पर्धेच्या यजमान शहराच्या लोगोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते अनावरण
INDvsAUS: हैद्राबादमध्ये तिकीटांसाठी चाहत्यांच्या लांबच लांब रांगा; पोलिसांचा लाठीचार्ज, जखमींचा आकडा…
“अन् ‘त्या’ सल्ल्यामुळे धोनीला दिले कर्णधारपद”, शरद पवारांचा जुन्या आठवणींना उजाळा