देशातील प्रमुख टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा हंगाम सुरू झाला आहे. विविध मैदानांवर देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व संघ या स्पर्धेत सहभागी झालेत. शुक्रवारी (14 ऑक्टोबर) खेळल्या गेलेल्या गोवा विरुद्ध हैदराबाद या सामन्यात भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने गोवासाठी खेळताना कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.
सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात गोवा संघाला प्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. यावर्षी मुंबई संघ सोडून अर्जुन तेंडुलकरसह सिद्धेश लाड व एकनाथ केरकर हे गोवा संघासाठी खेळताना दिसत आहेत. या तीनही खेळाडूंनी पहिल्या दोन सामन्यात संघाच्या विजयात योगदान दिले होते. या तिसऱ्या सामनासाठी गोलंदाजी करताना अर्जुन तेंडुलकरने 4 षटकात केवळ 10 धावा देत 4 बळी टिपले. विशेष म्हणजे यादरम्यान त्याने एक निर्धाव षटकही टाकले. गोवा संघासाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला.
अर्जुन याने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आपले पदार्पण केले होते. त्रिपुरा विरुद्धच्या या सामन्यात 3 षटकात 20 धावा देऊन तो एकही बळी मिळवू शकला नव्हता. त्यानंतर मणिपूरविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 षटकात 20 धावांवर 2 गडी बाद केलेले. त्याने स्पर्धेत आत्तापर्यंत 4.56 अशा मामुली इकॉनामीने धावा खर्च केल्या आहेत.
सलग दोन वर्ष मुंबई संघासाठी संधी न मिळाल्याने अर्जुनने गोवा संघासाठी खेळण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी तो भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेताना दिसलेला. आयपीएल मध्ये देखील तो अद्याप मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबो! भारत अन् पाकिस्ताननंतर आता ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड बनला चाहत्यांचा आवडता सामना, सर्व तिकिटांची विक्री
‘हुड्डा आ जाएगा मैं चला…’, हे काय बोलून गेला विराट? व्हिडिओ व्हायरल