नुकतेच भारताच्या स्थानिक क्रिकेटच्या स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर झाले आहेत. मानाच्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy), विजय हजारे ट्रॉफी यांचा त्यामध्ये समावेश आहे. अशातच एक धक्कादायक बाब पुढे आली ती म्हणजे अर्जुन तेंडुलकरने मुंबई संघाला सोडले. त्याला मुंबईने इतर संघासाठी खेळण्यास परवानगी देताना एनओसीही दिला आहे. त्याने वडिलांप्रमाणे मुंबई संघाकडून खेळण्याच्या निर्णयाला का बदलले असेल आणि आता तो कोणत्या संघाकडून खेळणार हे प्रश्न निश्चितच पडले असतील, तर यामध्ये आपण त्याच प्रश्नांची उत्तरे घेऊ.
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने मुंबई संघाला सोडले आहे. तर पुढील स्थानिक हंगाम तो गोवा या संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. मुंबईने त्याला परवाणगी देताना एनओसीही दिली आहे. यामुळे आगामी हंगामात तो गोव्यासोबत करार करू शकतो.
स्पोर्टस्टारच्या माहितीनुसार, गोवा क्रिकेट संंघाचे सेक्रेटरी विपूर फडके यांनी म्हटले, आम्ही त्याला फिटनेस शिबीर आणि ट्रायलसाठी आंमत्रित केले आहे. त्याला फिटनेस टेस्टसाठी गोव्याला यावे लागेल. तसेच तो त्यात उत्तीर्ण होत त्याने ट्रायलचा टप्पाही पार पाडला तर क्रिकेट संचालन समिती योग्य तो निर्णय घेणार आहे.
सचिन रमेश तेंदुलकर स्पोर्ट्स मॅनेजमेंटने त्यांच्या विधानात म्हटले, अर्जुनला त्याच्या क्रिकेटच्या कामगिरीसाठी सर्वाधिक वेळ मैदानावर घालवण्याची आवश्यकता आहे. आम्हाला विश्वास आहे की त्याला सर्वाधिक स्पर्धामध्ये खेळण्याची संधी मिळेल आणि त्याचा खेळही उंचावेल. तो आपल्या क्रिकेटच्या एका नव्या अध्यायाची सुरूवात करत आहे.
मुंबई संघात निवड झाली असताना अर्जुनला खेळण्याच्या खूपच कमी संधी मिळाल्या. त्याने सईद मुश्ताक अली ट्रॉफी या टी२० स्पर्धेचे फक्त दोनच सामने खेळले आहेत. यामुळे त्याने सर्वाधिक सामने खेळण्यासाठी मुंबईपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी ही मुंबईच्या संघात होता, तरीही त्याला बाकावरच बसावे लागले होते. मुंबई संघ हा अप्रतिम संघ असून त्यांच्याकडे अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत, यामुळेच अर्जुनला सामने खेळण्याची संधी मिळाली नाही.
अर्जुनला गोव्यामध्ये खेळण्यासाठी फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. त्यानंतरच पुढचे टप्पे सुरू होतील. अर्जुन हा डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करणारा खेळाडू आहे. तसेच त्याला जर फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर त्यामध्ये तशी चांगली क्षमता आहे. जर त्याला गोव्याकडून खेळण्याची संधी मिळाली तर तो किती सामने खेळणार हे कळेलच.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsPAK: दुबईचे मैदान अन् रोहित शून्यावर बाद! चाहत्यांच्या कायम लक्षात राहिलेला ‘तो’ सामना
चेस ऑलिंपियाड: भारताचे नियोजन पाहून विदेशी अधिकारीही झाले हवालदिल, खर्चाची रक्कम वाचून तुम्हीही..
‘प्रसिद्धीसाठी खोटं बोलतेस, माझ्या मागे लागू नको’, उर्वशी रौतेलाला रिषभ पंतने ऐकवली खरीखोटी