---Advertisement---

अर्जुन तेंडुलकरची सुटका नाही, नेटकऱ्यांनी धरले पुन्हा एकदा धारेवर

On: शनिवार, जुलै 21, 2018 7:53 AM
---Advertisement---

१९ वर्षाखालील भारतीय संघाच्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अर्जुन तेंडूलकरला खास कामगिरी करता आली नाही.

अष्टपैलू अर्जुनने या सामन्याच्या दोन्ही डावात प्रत्येकी एक बळी मिळवला. तर फलंदाजी करताना शून्यांवर बाद झाला.

यापूर्वी १९ वर्षाखालील संघात निवड झाल्याने सचिन तेंडूलकर, अर्जुन आणि भारतीय संघाच्या निवड समितीवर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती.

तसेच सचिन आणि अर्जुनची सोशल मिडियावरुन मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली होती.

या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात अर्जुन शून्यावर बाद झाल्याने पुन्हा एकदा नेटकऱ्यांचा शिकार ठरला आहे. अर्जुनच्या या कामगिरीमुळे सोशल मिडियावरुन मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.

https://twitter.com/tashandstar/status/1019834823932723200

https://twitter.com/rajatbajaj619/status/1019830092967567361

https://twitter.com/kajaki_desk/status/1019835852439150592

https://twitter.com/BhaavnaArora/status/1020174009449803776

१७ ते २० जुलै या दरम्यान कोलंबो येथील  नॉडेस्क्रीप्ट क्रिकेट क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला एक डाव आणि २१ धावांनी पराभूत केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-श्रीलंकेचा धुव्वा उडवत 19 वर्षाखालील भारतीय संघाचा पहिल्या कसोटीत विजय

-एमएस धोनीकडून पार्थिव पटेल घेतोय सल्ला?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment