इंडियन प्रीमीयर लीग २०२२ चे (Indian Premier League 2022) बिगुल वाजले असून १२-१३ फेब्रुवारी रोजी या हंगामासाठी मेगा लिलाव (Mega Auction) होणार आहे. या लिलावाला अजून २ आठवडे शिल्लक असताना लिलावात अंतिम निवड करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. आयपीएल २०२२ लिलावासाठी तब्बल १२१४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. पण, आता ५९० खेळाडूंची लिलावासाठी अंतिम निवड करण्यात आली आहे.
या ५९० खेळाडूंमध्ये तब्बल ३५५ अनकॅप्ड खेळाडू असून यंदाच्या हंगामात यातील अनेकांचे नशीब चमकताना दिसेल. याच साखळीत भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याचा मुलगा (Sachin Tendulkar’s Son) अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याचेही नाव आहे.
आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात अर्जुनला अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत जागा मिळाली आहे. परंतु दुर्देवाची बाब म्हणजे, अर्जुनला आतापर्यंत आयपीएलमध्ये वडील सचिनपेक्षा फारच कमी रक्कम मिळाली आहे. हा युवा शिलेदार यंदा २० लाखांच्या मूळ किंमतीसह आयपीएलच्या मेगा लिलावात उतरला आहे. गतवर्षीही याच मूळ किंमतीसह अर्जुनने आयपीएल लिलावात त्याचे नाव नोंदवले होते. त्यावेळी मुंबई इंडियन्सने याच किंमतीला त्याला आपल्या ताफ्यात विकत घेतले होते. परंतु त्याला मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची मात्र संधी मिळाली नव्हती.
दुसरीकडे सचिनला आयपीएलच्या पहिल्याच हंगामात म्हणजे २००८ मध्ये मुंबई इंडियन्सने कोट्यवधी रुपये मोजत विकत घेतले होते. मुंबई फ्रँचायझीने मास्टर ब्लास्टर सचिनला जवळपास १.६ मिलियन डॉलर्समध्ये (USD 1.6 million) विकत घेतले होते.
आयपीएलनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्येही चमकू शकला नाही अर्जुन
आयपीएलनंतर २०२१ मध्ये २२ वर्षीय अर्जुनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. परंतु तो पूर्ण हंगामात फक्त २ सामने खेळू शकला आणि यादरम्यान त्याने केवळ दोनच विकेट्स घेतल्या होत्या.
त्यामुळे यंदाच्या आयपीएल हंगामात कोणती फ्रँचायझी त्याला किती रुपयांना आपल्या ताफ्यात सहभागी करते? की, तो खरेदीदार न मिळाल्याने अनसोल्ड राहातो?, यावर सर्वांच्या नजरा असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
मेगा लिलावात ४८ खेळाडू २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये, जाणून घ्या पडिक्कलपासून ते रायुडूपर्यंतची नावे
‘बेंगलुरू बुल्स’ने नोंदवला हंगामातील आठवा विजय, ‘यूपी योद्धां’ना ३१-२६ ने चारली धूळ
विराटने गिफ्ट केला होता फ्लॅट, तर धोनीने बोलावले होते मुंबईला, कोण आहे ही पूजा बिश्नोई? घ्या जाणून