---Advertisement---

आयपीएल लिलावाआधीच सचिनचा लेक मुंबई इंडियनच्या ताफ्यात? सोशल मीडियावर चर्चेला उधान

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 2:04 PM
---Advertisement---

जगप्रसिद्ध अशा इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वांच्या तोंडून फक्त लिलावाची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यातही भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याला मुलगा अर्जुन तेंडूलकर यंदा लिलावात सहभागी होणार आहे. त्यामुळे अर्जुनविषयी कुजबुज होणे साहजिक आहे. मात्र आयपीएल २०२१ चा लिलाव सुरू होण्यापुर्वीच सचिनने प्रतिनिधित्त्व केलेल्या मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने अर्जुनला विकत घेतले असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

त्याचे झाले असे की, बुधवारी (१७ फेब्रुवारी) अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील स्टोरीमध्ये स्वत:चा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तो योगा करताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, तो मुंबई संघाची जर्सी घालून योगाचा सराव करत आहे. त्यामुळे अर्जुनच्या स्टोरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

लिलाव सुरू होण्याआधीच अर्जुनला मुंबईच्या जर्सीत पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळे तर्क-वितर्क लावले आहेत. अनेकांनी लिलावापुर्वीच मुंबईने अर्जुनला विकत घेतले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

तसे पाहायचे झाले तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर त्याच्या आयपीएल कारकिर्दीत मुंबई संघाचा सदस्य होता. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो दरवर्षी प्रत्यक्षात जाऊन मुंबईला पाठींबा देताना दिसतो. एवढेच नव्हे तर, सचिनचा लेक अर्जुन तेंडूलकर आयपीएल २०२० वेळी नेट बॉलरच्या रुपात मुंबईसोबत संयुक्त अरब अमिरातीला गेला होता. त्यामुळे जर यंदाच्या लिलावात मुंबईने अर्जुनला विकत घेतल्यास आश्चर्य वाटण्याजोगी कोणतीही बाब नसेल.

आयपीएल २०२१ च्या मिनी लिलावासाठी एकूण २९२ खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. यामध्ये अनकॅप खेळाडूंच्या यादीत अर्जुनचेही नाव आहे. त्याला २० लाख या आधारभूत किंमतीला लिलावात स्थान देण्यात आले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबईसह राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब हे संघदेखील त्याच्यासाठी बोली लावण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अश्विनच्या शतकाचं जोरदार सेलिब्रेशन करणाऱ्या सिराजला सचिन म्हणतो, ‘…म्हणून मला तुझा अभिमान आहे’

याला म्हणतात आगीत तेल ओतणे! इंग्लिश दिग्गजाने उचलून धरला कोहलीचा मुद्दा, सामना बंदीची केली मागणी

भूरर..! आयपीएल लिलावाचा थरार चालू असताना टीम इंडिया सोडणार चेन्नई, होणार अहमदाबादला रवाना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---