---Advertisement---

अश्विनच्या शतकाचं जोरदार सेलिब्रेशन करणाऱ्या सिराजला सचिन म्हणतो, ‘…म्हणून मला तुझा अभिमान आहे’

On: गुरूवार, फेब्रुवारी 18, 2021 1:12 PM
Mohammad-Siraj-And-R-Ashwin
---Advertisement---

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली. त्यातही आर अश्विनने गोलंदाजीसह फलंदाजीतही दमदार प्रदर्शन करत आपल्या अष्टपैलू क्षमतेचा दाखला दिला. जेवढी अश्विनच्या कामगिरी चर्चा रंगली, तेवढीच युवा क्रिकेटपटू मोहम्मद सिराजच्या एका कृत्याचीही चर्चा झाली. याचविषयी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने भाष्य केले आहे.

झाले असे की, चेन्नई येथील खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देत होती. या खेळपट्टीवर भारताचा प्रमुख फिरकीपटू आणि चेन्नईचाच रहिवासी असलेल्या आश्विनने दुसऱ्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत लाजवाब शतक ठोकले. अश्विनने डावाच्या ८२ व्या षटकात मोईन अलीच्या चेंडूवर चौकार मारत आपले शतक पूर्ण केले. यावेळी नॉन स्ट्राइकवर असलेल्या सिराजला इतका आनंद झाला की, चेंडू चौकारापर्यंत पोहोचण्याआधीच त्याने सेलिब्रेशन सुरू केले होते.

त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. तसेच, सोशल मीडियावरून त्याच्या निस्वार्थ कृतीचे सर्वांनी कौतुक केले होते. याच साखळीत आता माजी भारतीय क्रिकेटपटू सचिनचे नाव जोडले गेले आहे. सचिनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत सिराजची प्रशंसा केली आहे.

सचिनने अश्विन आणि सिराज यांचा एकमेकांना गळाभेट दितानाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यावर कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, ‘यालाच तर सांघिक खेळ म्हणतात. एकमेकांच्या कामगिरीवर आनंदी होणे, त्याच्या आनंदात आपणही सहभागी होणे. मला तुझा अभिमान आहे सिराज.’

https://www.instagram.com/p/CLZVj1xMiSg/?utm_source=ig_web_button_share_sheet

अश्विनच्या दुसऱ्या डावातील शतकी खेळीमुळे भारताने इंग्लंडपुढे ४८२ धावांचे भलेमोठे लक्ष्य उभारले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १६४ धावांवरच गारद झाला होता. परिणामत भारताने ३१७ धावांनी तो सामना खिशात घातला होता. यासह मालिकेत १-१ ने बरोबरीही साधली. यानंतर २४ फेब्रुवारी रोजी हे दोन्ही संघ तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आमने सामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भावा जिंकलंस रे जिंकलंस..! शतक झालं अश्विनचं पण सेलिब्रेशन केलं सिराजने

याला म्हणतात आगीत तेल ओतणे! इंग्लिश दिग्गजाने उचलून धरला कोहलीचा मुद्दा, सामना बंदीची केली मागणी

भूरर..! आयपीएल लिलावाचा थरार चालू असताना टीम इंडिया सोडणार चेन्नई, होणार अहमदाबादला रवाना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---