---Advertisement---

सचिनच्या पोरानं दाखवली ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला खुन्नस, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

On: शनिवार, मे 18, 2024 4:16 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 चा 68वा सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) या दोन संघात खेळला गेला. दोन्ही संघांचा या हंगामातील हा अखेरचा सामना होता. या सामन्यात लखनऊनं मुंबईचा 18 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊनं 20 षटकात 214 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 196 धावाच करू शकला.

मुंबई इंडियन्सनं या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला खेळण्याची संधी दिली होती. तो जसप्रीत बुमराहच्या जागी संघामध्ये आला. या सामन्यात अर्जुन वेगळ्याच रुपात दिसला. त्यानं गोलंदाजी करताना थेट लखनऊचा फलंदाज मार्कस स्टाॅयनिसलाच खुन्नस दाखवली. यावर स्टाॅयनिसनं देखील गप्प न राहता त्याला प्रत्युत्तर दिलं. या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युजर्स या व्हिडिओवर सातत्यानं कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना अर्जुनचं हे आक्रमक रुप आवडलं, तर काहींनी त्याच्यावर टीका देखील केली आहे. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

 

अर्जुन तेंडुलकरचा या हंगामातला हा पहिलाच सामना होता. त्यानं 2.2 षटकांध्ये 22 धावा दिल्या. 14व्या षटकात निकोलस पूरननं त्याला सलग 2 षटकार मारले. त्यानंतर तो पायाला झालेल्या दुखापतीमुळे षटक पूर्ण न करताच बाहेर पडला. या सामन्यातील विजयानंतर लखनऊ सुपर जायंट्सनं गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली. परंतु संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

दुसरीकडे, मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम खूपच खराब राहिला. संघानं या हंगामात 14 सामने खेळून फक्त 4 विजय मिळवले. ते गुणतालिकेत (Points Table) शेवटच्या स्थानावरती राहिले. तर लखनऊनं हंगामाच्या पहिल्या 7 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवून दमदार सुरुवात केली. मात्र अखेरच्या 7 पैकी त्यांना केवळ 3 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. लखनऊची टीम गुणतालिकेत 6व्या क्रमांकावर राहिली.

महत्त्वाच्या बातम्या – 

2 चेंडूत 2 षटकार खाल्यानंतर ओव्हर पूर्ण न करताच मैदानाबाहेर गेला अर्जुन तेंडुलकर! समोर आलं मोठं कारण

“प्रत्येक संघात बुमराह, राशिद सारखे गोलंदाज नसतात”, इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर विराट कोहलीची स्पष्ट भूमिका

ऑरेंज कॅपसाठी चुरशीची लढत, पर्पल कॅपवर बुमराह नाही तर ‘या’ भारतीय गोलंदाजाचा कब्जा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---