इंडियन प्रीमीयर लीग 2022 (IPL 2022) हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी पार पडला. बंगळुरू येथे पार पडलेल्या या लिलावात अनेक युवा खेळाडूंना मोठ्या बोली लागल्या. यामध्ये अर्जुन तेंडुलकर याचेही (Arjun Tendulkar) नाव होते. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असलेल्या अर्जुनवर मुंबई इंडियन्सने सर्वाधिक बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतली.
आयपीएलचा हा 15 वा हंगाम आहे. या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावात (IPL Auction) 204 खेळाडूंवर बोली लागली. यामध्ये अर्जुनवर मुंबई इंडियन्सने 30 लाखांची बोली लावली. त्याची मुळ किंमत 20 लाख रुपये होती. पण, मुंबईने 30 लाखांची बोली त्यावर लावली. त्याबद्दल स्वत: अर्जुनने प्रतिक्रिया दिली असून त्याची मोठी बहीण सारानेही आपला आनंद व्यक्त केला.
अर्जुनला खरेदी केल्यानंतर मुंबई इंडियन्सने ट्वीटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात अर्जुनने म्हणले आहे की, ‘मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा येऊन आनंदी आहे. मी या फ्रँचायझीचा 2008 पासून चाहता राहिला आहे. मी संघमालक आणि फ्रँचायझींचे आभार मानतो. मी संघासाठी सर्वोत्तम योगदान देईल.’
अष्टपैलू खेळाडू असलेल्या अर्जुनला मुंबईने आपल्या संघात घेतल्याबद्दल त्याची बहीण साराने आनंद व्यक्त केला. तिने इंस्टाग्राम स्टोरीला अर्जुनची पोस्ट शेअर करत हृदयाच्या इमोजी शेअर केल्या आहेत. सारा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
अर्जुन यापूर्वीही मुंबई इंडियन्सचा भाग होता. त्याला 2021 लिलावात मुंबईने 20 लाखात आपल्या संघात सामील करून घेतले होते. पण तो 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या सत्रातून दुखापतीमुळे बाहेर झाला होता. त्यामुळे अद्याप अर्जुनचे आयपीएल पदार्पण झालेले नाही. त्याचमुळे त्याला आयपीएल 2022 मध्ये आयपीएल पदार्पणाची आशा असेल.
अर्जुनने त्याच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत वरिष्ठ मुंबई संघाकडून 2 टी20 सामने खेळले आहेत. त्याने 2 विकेट्स या 2 सामन्यात खेळताना घेतल्या आहेत. अर्जुनची काही दिवसांपू्र्वीच 2022 रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबई संघात निवड झाली आहे. त्यामुळे अर्जुनला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाचीही संधी या रणजी ट्रॉफी स्पर्धेत मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
“आज बाबांना खूप आनंद झाला असता”; ‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धन झाला भावूक
VIDEO: अनसोल्ड राहिलेला श्रीसंत गातोय,’ रूक जाना नहीं तू कभी हार के’
भारतीय मुलीशी मार्चच्या अखेरीस लग्नगाठ बांधणार मॅक्सवेल! तमिळ भाषेतील लग्नपत्रिका व्हायरल