फर्ग्युसन कॉलेज यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – फर्ग्युसन कॉलेज विजयेंद्र कुलकर्णी मेमोरियल अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात अर्जुन वेल्लूरी, रौनक ललवाणी, अद्विक नाटेकर, स्वर्णीम येवलेकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अर्जुन वेल्लूरीने जोशुआ डिक्रूजचा 9-6 असा तर गुजरातच्या पेरनील पटेलने तनय कोटकचा टायब्रेकमध्ये 9-8(6) असा संघर्षपूर्ण पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. स्वर्णीम येवलेकर व अद्विक नाटेकर यांनी अनुक्रमे कबीर जेटली व पृथ्वीराज चव्हाण यांचा 9-0 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. प्रजीत मदीरेड्डी याने स्वराज भिसेचा 9-4 असा तर, तेलंगणाच्या वेदांश केशरी याने महाराष्ट्राच्या वेदांत माणकेश्वरचा 9-2 असा सहज पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले
प्रजीत मदीरेड्डी(महा)वि.वि.स्वराज भिसे(महा)9-4;
अर्जुन वेल्लूरी(महा)वि.वि.जोशुआ डिक्रूज(महा)9-6
रौनक ललवाणी(महा)वि.वि.रोहन बोर्डे(महा)9-2;
पेरनील पटेल(गुजरात)वि.वि.तनय कोटक(महा)9-8(6);
अद्विक नाटेकर(महा)[3] वि.वि.पृथ्वीराज चव्हाण(महा) 9-0;
रोनित नागरी(महा)वि.वि.ऋषी जैन(महा)9-0;
वेदांश केशरी(तेलंगणा)वि.वि.वेदांत माणकेश्वर(महा)9-2;
स्वर्णीम येवलेकर(महा)वि.वि.कबीर जेटली(महा)9-0;
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषक चॅम्पियन भारताने ‘या’ अनोख्या स्टाईलने मानले चाहत्यांचे आभार
पीएमडीटीए-केपीआयटी- सोलिंको रोहित शिंदे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरीज 2022 स्पर्धेत अवनी देसाई, वीरा काकडे यांचा मानांकीत खाळाडूंवर विजय