अवघ्या काही दिवसांतच भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघामध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. ही मालिका सुरू असताना भारतीय संघातील खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेचा सराव करण्यात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर बीसीसीआयने युवा खेळाडूंचा संघ पाठवला आहे. अशातच ही मालिका सुरू होण्यापूर्वी माजी श्रीलंकन कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी आपले मत मांडले आहे.
भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकांसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. यावरून माजी श्रीलंकन कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी निराशा व्यक्त केली आहे.
त्यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “हा दुसऱ्या श्रेणीचा भारतीय संघ आहे आणि त्यांचे इथे येणे आमच्या क्रिकेटचा अपमान आहे. टेलिव्हिजन मार्केटिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासोबत खेळण्याचे मान्य केल्याबद्दल मी सध्याच्या प्रशासनाला दोष देतो.”(Arjuna ranatunga criticises SLC for hosting second string Indian team)
तसेच ते पुढे म्हणाले की, “भारताने आपला बलाढ्य संघ इंग्लंडला रवाना केला आहे. तर कमकुवत संघ इथे पाठवला आहे. मी यासाठी बोर्डाला दोषी ठरवतो.” या भारतीय संघाचे कर्णधारपद शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे. तर उप कर्णधारपद भुवनेश्वर कुमारच्या हाती देण्यात आले आहे.
असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज :
ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग
असे आहे भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १३ जुलै
२) दुसरा वनडे सामना – १६ जुलै
३) तिसरा वनडे सामना – १८ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २१ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २२ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २५ जुलै
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान बोर्डाची मोठी मागणी, चक्क ६ आयसीसी स्पर्धांचे यजमानपद भूषवण्याची दाखवली तयारी
टीम इंडियाला मिळणार नवी सलामी जोडी, मयंक-राहुल नव्हे ‘हा’ कसोटीपटू घेणार शुबमनची जागा?
धक्कादायक! ‘या’ माजी प्रशिक्षकाने भारतीय खेळाडूंना सामन्यापूर्वी चक्क सेक्स करण्याचा दिला सल्ला






