ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात रविवारी (29 नोव्हेंबर) दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 51 धावांनी विजय मिळवला. या विजयात ऍरॉन फिंच आणि डेविड वॉर्नरने केलेल्या 142 धावांची सलामी भागीदारीचा मोठा वाटा राहिला. यामुळे त्यांनी एक खास विक्रम केला आहे.
फिंच आणि वॉर्नर यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्यांमध्ये 5 व्यांदा शतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे आता भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिकवेळा शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर शिखर धवन आणि रोहित शर्माची जोडी आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत 6 वेळा शतकी भागीदारी केली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यांत शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हे क्रिकेट विश्वातील बलाढ्य संघ आहेत. या दोन्ही संघात अगदी 90 च्या दशकापासून चुरशीचे सामने पाहायला मिळतात. दोन्ही संघात उच्च दर्जाचे खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध अवघड आव्हान उभे ठेवतात. मात्र, या आव्हानांचा सामना करत काही फलंदाजांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
या लेखात आपण अशा फलंदाजांच्या जोडींबद्दल माहिती पाहाणार आहोत ज्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यात सर्वाधिकवेळा शतकी भागीदारी केली आहे.
• शिखर धवन- रोहित शर्मा (6 वेळा)
भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर हे ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच उत्तम कामगिरी करतात. या दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल 6 वेळा शतकी भागीदारी केली आहे.
• फिंच-वॉर्नर (5 वेळा)
ऑस्ट्रेलियाची अनुभवी सलामीवीर जोडी ऍरॉन फिंच आणि डेविड वॉर्नर यांनी भारताविरुद्ध खेळताना 5 वेळा शतकी भागीदारी केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबर 2020 मध्ये 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात सलग दोन वेळा या जोडीने शतकी भागीदारी केली.
भारत-ऑस्ट्रेलिया वनडेत 4 वेळा शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्यांची यादी
ऍरॉन फिंच- स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
डेविड बून- जॉफरी मार्श (ऑस्ट्रेलिया)
ऍडम गिलख्रिस्ट- मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया)
विराट कोहली- रोहित शर्मा (भारत )
सचिन तेंडुलकर- व्हीव्हीएस लक्षण ( भारत )
अजिंक्य राहणे- रोहित शर्मा ( भारत )
महत्त्वाच्या बातम्या –
IND vs AUS ODI : भारताचा पुन्हा लाजीरवाणा पराभव, 51 धावांनी विजयासह ऑस्ट्रेलियाचा मालिकेवर ताबा