---Advertisement---

मेसट ओझीलच्या नेतृत्वाखाली अर्सेनलने मिळवला पहिला विजय

On: रविवार, जुलै 29, 2018 6:00 AM
---Advertisement---

अमेरिकेत सुरू असलेल्या इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये अर्सेनलने पॅरीस सेंट-जर्मनला (पीएसजी) 5-1ने पराभूत केले. यावेळी अर्सेनल संघाच्या कर्णधारपदी मेसट ओझीलची निवड करण्यात आली होती.

या सामन्याचा पहिला गोल ओझीलने 13व्या मिनिटालाच केला. अलेक्झांड्रा लॅकझेट याने 67व्या आणि 71व्या मिनिटाला दोन गोल केले. तर पीएसजी कडून क्रिस्तोफर कुकुने हा एकमेव गोल केला.

21व्या फिफा विश्वचषकात जर्मनकडून खेळणाऱ्या ओझील या मिडफिल्डरला काही दिवसांपूर्वीच वंशभेदामुळे संघाच्या बाहेर पडावे लागले. जर्मन चाहत्यांकडून सातत्याने होणाऱ्या वंशभेदाच्या टिकेमुळे ओझीलने हा टोकाचा निर्णय घेतला.

मुळचा तुर्कीचा असलेल्या ओझीलने तुर्कीचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगन यांच्यासोबत काढलेल्या फोटोमुळे त्याला वंशभेदाचा सामना करावा लागत आहे.

या स्पर्धेत अर्सेनल हा 2पैकी 1 सामना जिंकून पहिल्या स्थानावर आहे. तर पीएसजी 18व्या स्थानावर आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

या खेळाडूने घ्यावी रोनाल्डोची जागा, रियल माद्रिदच्या चाहत्यांची मागणी

दोन वर्षाच्या तुरूंगवासापासून वाचण्यासाठी रोनाल्डोला भरावे लागणार तब्बल १५० कोटी

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment