सध्या भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघातील पहिला टी20 सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगला आहे. दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) इतिहास रचला आहे. तो भारतासाठी सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.
भारत-इंग्लंड संघातील टी20 मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथे खेळला जात आहे. या सामन्यात अर्शदीपने दमदार गोलंदाजी केली. त्याने सुरुवातीच्या षटकांमध्ये इंग्लंडच्या 2 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंगने युजवेंद्र चहलसह अनेक गोलंदाजांना मागे टाकले आहे.
खरे तर, कोलकाता टी20 मध्ये सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. यावेळी इंग्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लंडने 17 धावांवर 2 विकेट गमावल्या. यादरम्यान, अर्शदीपने दोन्ही विकेट्स घेतल्या. अर्शदीपने प्रथम फिलिप सॉल्टला बाद केले. यानंतर त्याने बेन डकेटची विकेट घेतली. डकेट 4 धावा करून तंबूत परतला.
अर्शदीपने चहलसह अनेक गोलंदाजांना मागे टाकले आहे. भारताकडून सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) नावावर होता. चहलने 80 सामन्यांमध्ये 96 विकेट्स घेतल्या आहेत. पण आता अर्शदीपने त्याला मागे टाकले आहे.
भारताकडून सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज
अर्शदीप सिंग – 97 विकेट्स*
युजवेंद्र चहल – 96 विकेट्स
भुवनेश्वर कुमार – 90 विकेट्स
हार्दिक पंड्या – 89 विकेट्स
जसप्रीत बुमराह – 89 विकेट्स
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर…! जसप्रीत बुमराहचे वर्चस्व, तर जडेजाही अव्वल स्थानी
IND vs ENG; भारताने जिंकला टाॅस! शमीला वगळले, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव असणार की नाही? BCCIच्या सचिवांनी दिले उत्तर