इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत अनुभवी खेळाडूंवर युवा खेळाडू भारी पडताना दिसत आहेत. त्या युवा खेळाडूंमध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्या नावाचाही समावेश आहे. पंजाब किंग्स संघाकडून खेळणाऱ्या अर्शदीपने आतापर्यंत आयपीएल 2023 स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले आहे. त्याची विकेट घेण्याची कला पाहून प्रत्येकजण त्याचा चाहता बनला आहे. अशात अर्शदीपच्या भविष्याविषयी भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
अर्शदीपने मोडले होते 2 स्टंप्स
अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत आतापर्यंत खेळण्यात आलेल्या 8 सामन्यांमध्ये 14 विकेट्सची कमाई केली आहे. त्याने यादरम्यान 8.9च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. त्याने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाविरुद्ध गोलंदाजी करताना अंतिम षटकात 16 धावांचा बचाव केला होता. त्याने आधी तिलक वर्मा आणि नंतर नेहाल वढेरा याला त्रिफळाचीत केले होते. त्याने दोन्ही वेळी मधला स्टंप्स मोडला होता. त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली होती.
रवी शास्त्रींचे मोठे भाष्य
एका क्रीडा वेबसाईटसोबत बोलताना रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी अर्शदीप सिंग याची जोरदार प्रशंसा केली. त्यांनी अर्शदीपला जसप्रीत बुमराह याच्या जागी भारतीय संघात सामील करण्याचाही सल्ला दिला. शास्त्री म्हणाले की, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर जितका जास्त मी अर्शदीपला पाहतो, मला वाटते की, तो भारतासाठी सर्व क्रिकेट प्रकार खेळू शकतो. मात्र, मी त्याला लाल चेंडूच्या क्रिकेट प्रकारात अधिक पाहिले नाहीये, पण अर्शदीप ज्याप्रकारे सुधारणा करत आहे आणि त्याचा आत्मविश्वास वाढत आहे. मला वाटते की, तो मागील वर्षाच्या तुलनेत जरा जास्त मजबूत होऊन आला आहे.”
अर्शदीप सिंगची कारकीर्द
अर्शदीप सिंग याने भारतीय संघासाठी टी20 क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने 8 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या होत्या. अर्शदीपच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 26 टी20 सामने खेळताना 46 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने 3 वनडे सामनेही खेळले आहेत. त्यात त्याला एकही विकेट घेण्यात यश आले नव्हते. आयपीएलबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 45 सामन्यात 54 विकेट्सची कामगिरी केली आहे. (arshdeep singh could play three formats for team india says former head coach ravi shastri)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जेव्हा 20 वर्षांनंतर हे पाहील…’, धोनीकडून Runout झाल्यानंतर जुरेलची मोठी प्रतिक्रिया, एकदा वाचाच
रबाडाने 2 नो-बॉल टाकताच भडकला दिग्गज क्रिकेटर; म्हणाला, ‘अरे तू एक आंतरराष्ट्रीय गोलंदाज…’