आयपीएल २०२१ हंगामात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत कोणालाच अंदाज येत नव्हता की, सामना कोणता संघ जिंकणार आहे. शेवटचे निर्णायक षटक टाकण्याची जबाबदारी केएल राहुलने युवा अर्शदीप सिंगला दिली होती. त्याने ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत संघाला विजय मिळवून दिला. यासोबतच त्याने संजू सॅमसनला देखील बाद केले. सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, संजू सॅमसन विरुद्ध शेवटच्या षटकात पंजाब किंग्ज संघाने काय रणनिती आखली होती.
या सामन्यात २२२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला शेवटच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता होती. परंतु शतकी खेळी करणारा संजू सॅमसन त्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यामुळे सामना पंजाबने ४ धावांनी जिंकला.
या सामन्यात शेवटचे षटक टाकणाऱ्या अर्शदीप सिंगने सामन्यानंतर म्हटले की, “आयपीएल हे खूप मोठे व्यासपीठ आहे आणि इतकी चांगली लीग आहे की, तुम्ही कुठल्याही संघाबद्दल काहीच सांगू शकत नाही. मी काही विशेष तयारी करत नाही, मी नेहमी पुनरागमन करण्याच्या प्रतीक्षेत असतो. सपोर्ट स्टाफही मला सर्व गोष्ट सरळ आणि साध्या ठेव असे सांगतात. मी नेहमी तशीच गोलंदाजी करतो जशी माझ्या कर्णधाराला माझ्याकडून हवी आहे.”
तसेच संजू सॅमसन विरुद्ध शेवटच्या षटकात काय रणनिती होती याबाबत खुलासा करताना अर्शदीप म्हणाला की,” माझी योजना अगदी साधी होती. वाइड आउटसाइड ऑफच्या दिशेने यॉर्कर चेंडू टाकायचे. यावर संजू सॅमसन जास्तीत जास्त चौकार मारु शकला असता. परंतु, माझ्या एका चेंडूवर त्याने खणखणीत षटकार खेचला. तरीही मी माझी योजना न बदलता गोलंदाजी केली आणि यशस्वी ठरलो.”
अर्शदिपने या सामन्यात ४ षटक गोलंदाजी केली. यात त्याने ३५ धावा देत ३ गडी बाद केले. तसेच त्याने अखेरच्या षटकात १३ धावांचा चांगला बचाव केला.
महत्त्वाच्या बातम्या –
असं कोण करतं भावा? नाणेफेकीवेळी संजू सॅमसनने केलं असं काही, केएल राहुलसह रेफरीही अचंबित
‘साड्डा पंजाब हार्ट अटॅक देणं बंद करणार नाही,’ पंजाब किंग्जच्या विजयानंतर संघ मालकिणीची प्रतिक्रीया
‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराचा मान यंदाही भारताच्या पारड्यात, ‘हा’ क्रिकेटपटू ठरला विजेता