भारताचा पुरूष क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून मालिकेतील तिसरा वनडे सामना बुधवारी (30 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. त्याआधी भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने एका संघसहकाऱ्याचे नाव घेतले, ज्याच्यामुळे त्याला वेगळाच फायदा होतो असे विधान केले आहे. त्याने म्हटले की, उमरान मलिक याच्यासोबत खेळताना खूप फायदा होतो कारण फलंदाजाला अचानकच संथ गतीच्या चेंडूचा सामना करावा लागतो आणि त्या नादात तो विकेट गमावून बसतो.
उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांनी न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या वनडे सामन्यातून आंतररराष्ट्रीय वनडे पदार्पण केले. या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला असला तरी उमरानने चांगली कामगिरी केली. त्याने दोन विकेट्स घेतल्या. त्याने न्यूझीलंडच्या डावात डेवॉन कॉनवे याला 16व्या षटकात बाद केले. ही त्याची आंतरराष्ट्रीय वनडेतील पहिली विकेट ठरली.
उमरान त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने आयपीएलमध्ये जलद वेगाने चेंडू टाकत सगळ्यांचे लक्ष वेधले होते. यामुळेच त्याला भारताच्या संघात घेतले गेले. त्याला टी20 विश्वचषकातही घेणार होते, मात्र तसे झाले नाही. आता त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे.
“उमरानसोबत खेळताना चांगला अनुभव आला. तो त्याच्या गोलंदाजीने फलंदाजांना दमवतो. तसेच फलंदाजांना जलदगती वेगवान गोलंदाज आणि एक मध्यमगती गोलंदाज यांचा सामना करताना अडचण येते. कारण वेग 155 वरून थेट 135 वर येतो आणि यामुळेच त्यांचे लक्ष विचलित होते,” असे अर्शदीपने म्हटले आहे. अर्शदीपला कारकिर्दीतील पहिल्या वनडेत एकही विकेट घेता आली नाही.
ही मालिका भारत शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली खेळत असून पहिला सामना संघाने गमावला आहे. यामुळे यजमानांनी 1-0 अशी आघाडी मिळवली, तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताला मालिका गमावायची नसेल तर तिसऱ्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे. हा मालिका निर्णायक सामना क्रिस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सकाळी 7 वाजता खेळला जाणार आहे. Arshdeep Singh said Umran’s bowling is beneficial for me
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजाची रिप्लेसमेंट अचूक! सौरभ कुमारच्या प्रभावी गोलंदाजीसमोर बांगलादेश ए ढेर
अरे, हे काय बोलून गेला इंग्लंडचा कोच! मॅक्युलम म्हणाला, ‘पाकिस्तानविरुद्ध हरलो तरी चालेल…’