भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सध्या भारतीय संघाचा भाग नाही. आता तो थेट इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल 2023) पंजाब किंग्स संघासाठी खेळताना दिसेल. इथे तो चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमनाचा प्रयत्न करेल. मात्र, त्याचवेळी त्याने आता थेट इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट चॅम्पियनशिप खेळण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.
https://twitter.com/KentCricket/status/1636698914786263040?t=rXTAWaP6N7HW5e1QGUAVQA&s=19
अर्शदीप सिंग याने मागील वर्षी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतरच भारतीय संघात स्थान पटकावले. सुरुवातीच्या सामन्यांमध्येच उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर त्याला थेट टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळाली होती. या स्पर्धेतही तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज राहिलेला. मात्र, यानंतर त्याची कामगिरी काहीशी खालावली. परिणामी, त्याला भारतीय संघातून डच्चू देण्यात आला.
भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या अर्शदीपने आता इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपसाठी केंट काउंटी क्लबसोबत करार केलेला आहे. आगामी हंगामात तो केंट संघाचे पाच सामन्यात प्रतिनिधित्व करेल.
केंटशी करारबद्ध झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना अर्शदीप म्हणाला,
“मला प्रथमश्रेणी क्रिकेट खेळायला आवडते. इंग्लंडमध्ये प्रथमश्रेणी क्रिकेट खेळून मी माझे कौशल्य आणखी सुधारण्याचा प्रयत्न करेल. राहुल द्रविड सरांनी देखील यापूर्वी त्यांचे केंट संघासोबतचे दिवस व तेव्हाचे अनुभव याबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
सध्या भारतीय संघातील अनेक खेळाडू हे काउंटी संघांशी करारबद्ध आहेत. यामध्ये चेतेश्वर पुजारा, कृणाल पंड्या, नवदीप सैनी, उमेश यादव व वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. काउंटी क्रिकेटचा आगामी हंगाम जून महिन्यात सुरू होईल.
(Arshdeep Singh Sign Kent County Contract For 5 Matches)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“जिममुळे क्रिकेटपटूंच्या दुखापती वाढल्या”, भारतीय दिग्गजाने दाखवून दिली सत्य परिस्थिती
बॅटमधून फ्लॉप, पण यष्टीमागे सुपरस्टार! ऑस्ट्रेलियन कर्णधाराला बाद करण्यात राहुलचा सिंहाचा वाटा, पाहा Video






