---Advertisement---

बॅटमधून फ्लॉप, पण यष्टीमागे सुपरस्टार! ऑस्ट्रेलियन कर्णधाराला बाद करण्यात राहुलचा सिंहाचा वाटा, पाहा Video

KL-Rahul
---Advertisement---

भारतीय संघाकडे एकापेक्षा एक खेळाडू आहेत. हे खेळाडू गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातून आपले कसब दाखवून देतात. या खेळाडूंमध्ये केएल राहुल याच्या नावाचाही समावेश होतो. राहुल मागील काही काळापासून खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्यामुळे त्याला नेहमीच टीकेचा सामना करावा लागतो. मात्र, आता टीकाकारांची बोलती बंद करण्याचे काम त्याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांची वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात केले. राहुलने यष्टीमागे अफलातून  झेल घेतला, ज्यामुळे आता सर्वत्र त्याची वाहवा होत आहे. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

झाले असे की, नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी ट्रेविस हेड (Travis Head) आणि मिचेल मार्श खेळपट्टीवर उतरले होते. यावेळी ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का हेडच्या रूपात बसला. हेडने 10 चेंडू खेळून 1 चौकाराच्या मदतीने 5 धावा केल्या. यानंतर तिसऱ्या स्थानी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) फलंदाजीला उतरला. स्मिथ याने मार्शसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र, तो जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही.

मार्शसोबत 75 धावांच्या भागीदारीवर खेळत असताना स्मिथने विकेट गमावली. भारताकडून 13वे षटक हार्दिक पंड्या टाकत होता. यावेळी पंड्याच्या तिसऱ्या चेंडूवर स्मिथने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या बॅटची कड घेत थेट सीमारेषेच्या दिशेने जात होता. तेवढ्यात यष्टीरक्षक केएल राहुल याने हवेत झेप घेत त्याचा शानदार झेल पकडला. त्यामुळे कर्णधार स्मिथला तंबूत परतावे लागले. यादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्मिथने 75 धावांच्या भागीदारीत 22 धावांचे योगदान दिले. यामध्ये 4 चौकारांचाही समावेश होता.

केएल राहुल बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटीत फ्लॉप
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीत केएल राहुल सपशेल फ्लॉप ठरला. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याला फक्त 2 सामन्यात संधी देण्यात आली. त्याने पहिल्या कसोटीत फक्त 20 धावांचे योगदान दिले होते. त्यानंतर त्याने दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 17 धावा आणि दुसऱ्या डावात 1 धाव केली. त्यामुळे त्याला उर्वरित दोन कसोटीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मात्र, राहुलकडे आता वनडे मालिकेत पुन्हा फॉर्ममध्ये परतण्याची संधी आहे. (ind vs aus 1st odi hardik pandya dismissed steve smith kl rahul catch see video here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: पहिला वनडे सामना सोडून मेव्हण्याच्या लग्नात रोहितने लावले ठुमके, पत्नी रितिकानेही दिली साथ
‘मी सुरेश रैना आहे, शाहिद आफ्रिदी नाही’, रैनाने का उडवली पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची खिल्ली?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---