मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटपटू अभिषेक नायरची केकेआर क्रिकेट आकादमीच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
बुधवारी (११ जुलै) कोलकाता नाईट रायडर्सने, केकेआर क्रिकेट आकादमीची घोषणा केली.
केकेआरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकीज मैसुर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे अभिषेक नायरची केकेआर क्रिकेट आकादमीच्या प्रशिक्षक पदी निवड केल्याची माहिती दिली.
या केकेआर क्रिकेट आकादमीचे पहिले सराव शिबीर मंगळवारी (११ जुलै) इनडोअर क्रिकेट स्टेडीयम बेंगलोर येथे सुरु झाले आहे.
त्याचबरोबर मुंबई क्रिकेट संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक ओंकार साळवी यांची केकेआर क्रिकेट आकादमीच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
” केकेआरकडे चांगले युवा आणि प्रतिभावान क्रिकेटपटू आहेत. त्यांना या क्रिकेट आकादमीच्या माध्यमातून आपल्या क्रिकेट कौशल्यात सुधारणा करण्याची चांगली संधी यामधून प्राप्त झाली आहे. केकेआरने या आकादमीच्या प्रशिक्षकपदी निवड करुन माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.” अभिषेक नायरने केकेआर क्रिकेट आकादमीच्या प्रशिक्षक पदी निवड झाल्यावर या शब्दात भावना व्यक्त केल्या.
2018-19 च्या रणजी मोसमात पॉंडेचरी क्रिकेट संघ देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.
त्यासाठी देशांतर्गत क्रिकेटचा मोठा अनुभव पाठीशी असलेल्या नायरला पॉंडेचरी क्रिकेट असोसिएशनने पॉंडेचरी संघात प्रशिक्षक आणि खेळाडू म्हणुन समाविष्ट होण्याचा प्रस्ताव दिला होता.
मात्र केकेआर क्रिकेट आकादमीच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर नायरने पॉंडेचरी क्रिकेट असोसिएशनचा प्रस्तावाला अप्रत्यक्षरीत्या नकार दर्शवल्याचे दिसत आहे.
अशी आहे अभिषेक नायरची देशांतर्गत क्रिकेट कारकिर्द-
अभिषेक नायरने 99 प्रथम श्रेणी सामन्यात 5284 धावा आणि 164 बळी मिळवले आहेत. त्याच्या या कामगिरीमुळे नायरने देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ठ अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणुन नाव कमावले आहे. तसेच भारतीय संघाकडून ३ सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिफा विश्वचषक २०१८: पराभवानंतर वार्नर-गंभीरने इंग्लंडला केले ट्रोल
-तिसऱ्या क्रमांकावर आज कोण? कोहली की केएल राहुल?