मुंबई क्रिकेट असोसिएशने मुंबईच्या वरिष्ठ आणि १९ वर्षाखालील संघासाठी प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते.
अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवार, ३ जुलैला भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज अजय रात्रा यांनीही मुंबई वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केलाआहे.
तसेच भारताचा माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार आणि प्रथम श्रेणी क्रिकेटपटू विनायक सामंत यांनीही मुंबई वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केले आहे.
तर १९ वर्षाखालिल मुंबई संघासाठी नंदन फडणीस, प्रीतम गंधे आणि विनोद राघवन यांनी दोन्ही संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केले आहेत.
२०१८-२०१८ च्या रणजी मोसमात अजय रात्रा पंजाब संघाचे प्रशिक्षक होते. अजय रात्रांना पंजाब संघ प्रशिक्षक पदावर २०१८-१९ च्या मोसमासाठी कायम ठेवणार आहे की नाही याबाबत त्यांना पंजाब संघाकडून अजूनपर्यंत कोणताही निरोप मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे.
तसेच १९ वर्षाखालील मुंबई संघाच्या प्रशिक्षक पदासाठी एकून आठ अर्ज आले आहेत. तर वरिष्ठ संघासाठी एकून सहा अर्ज आले आहेत.
मुंबई क्रिकेटचा रंजक इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्ही वाचू शकता महा स्पोर्ट्सची खास लेखमाला-
-मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण
-मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- २: मुंबईत कसोटीचे आगमन आणि स्वातंत्र्यपूर्व क्रिकेट