नोव्हेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारताच्या या दौऱ्याला चार महिन्यांचा अवधी असताना ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी वाकयुद्ध सुरु केले आहे.
गेल्या आठवड्यात वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियन संंघ विराट कोहलीला ऑस्ट्रेलियात एकही शतक करु देणार नाही असे वक्तव्य केले होते.
मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने विराट कोहलीवर विश्वास व्यक्त केला आहे. ब्रेट लीच्या मते विराट कोहली ऑस्ट्रेलियात नक्की शतक करले असे मत व्यक्त केले आहे.
“कोहलीकडे या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी भरपूर काही आहे, आणि तो या दौऱ्यात नक्की सिद्ध करेल. तो या वेळच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नक्की शतके करेल. कारण त्याच्यासारखा धावांसाठी भुकेला फलंदाज मी पाहिला नाही.” विराट कोहली विषयी बोलताना ब्रेट ली असे म्हणाला.
पुढे ब्रेट लीने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिका विजयासाठी ऑस्ट्रेलिया प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले.
“भारताची ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या दोन दौऱ्यात चांगली कामगिरी झाली नाही. 2011-12 मध्ये भारत 4-0 असे पराभूत झाला होता. तर 2014-15 साली भारताचा कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव झाला होता. त्यामुळे मला असे वाटते की, या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया भारतीय संघाला वरचढ ठरेल.” भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील कामगिरी विषयी बोलताना ब्रेट ली म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-पाकिस्तानी गोलंदाजाला अतिउत्साह नडला सेलिब्रेशन करताना स्वतःलाच केले जखमी
-अर्जुन तेंडुलकरने मिळवला पहिला बळी, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुरवात