---Advertisement---

‘असं नाहीये…’, गांगुलींविषयीच्या चुकीच्या बातम्यांवर बीसीसीआय अधिकाऱ्यानेच लावला पूर्णविराम

On: शनिवार, ऑक्टोबर 15, 2022 12:19 AM
Sourav-ganguly-1
---Advertisement---

मागच्या काही दिवसांमध्ये सौरव गांगुली यांच्याविषयी वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या आहेत. माध्यमांतील वृत्तांमधून गांगुली बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत. अनेक वृत्तांनुसार बोर्डाचे काही सदस्य गांगुलींवर नाराज असल्याचेही सांगितले जात आहे. पण सध्या बीसीसीआयच्या कोषाध्यक्षाची भूमिका पार पाडणारे अरुण धुमाळ यांनी या बातम्या चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले आहे. धुमाळ यांच्या मते गांगुलींच्या कार्यकाळात बोर्डाने चांगले काम केले. 

माध्यमांतील वृत्तानुसार भारतासाठी 1983 साली पहिला विश्वचषक मिळवून देणाऱ्या संघातील रॉजर बिन्नी (Roger Binny) बोर्डाचे नवीन अध्यक्ष असतील. जय शहा सचिपदावर कायम राहणार असून राजीव शुक्ला बीसीसीआयचे उपाध्यक्ष असतील. आशीष शेलार बीसीसीआयच्या कोषाध्याक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत, तर देवजीत सौकिया नवीन संयुक्त सचिव असणार आहेत. मात्र, याविषयी अजून कसल्याही प्रकारची अधिकृत घोषणा झाली नाहीये. माहीतीनुसार सौरव गांगुली (Sourav Ganguly) अध्यक्षपद सोडण्यासाठी इच्छुक नसतानाही त्यांना हा निर्णय घ्यावा लागणार आहे.

अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांच्या हवाल्याने पीटीआयने माहिती दिली की, “बीसीसीआयचा एकही अध्यक्ष असा नाहीये, ज्याने स्वतंत्र भासतासाठी तीन वर्षापेक्षा जास्त ही जबाबदारी पार पाडली आहे. दादांविषयी (गांगुली) माध्यमांमध्ये असे सांगितले जात आहे की, काही बोर्डातील काही सदस्य त्यांच्या विरोधात आहेत. या सर्व बातम्या निराधार आहेत. कुणीच त्यांच्या विरोधात एक शब्दही बोलले नाहीये. त्यांनी कोरोना काळात उद्भवलेल्या अडचणींमध्ये बोर्ड ज्या पद्धतीने चालवले, त्यासाठी सर्व सदस्य आणि संघ त्यांच्यावर खुश आहे. भारताच्या कर्णधाराच्या रूपात त्यांची कारकिर्द चांगली राहिली आहे. ते एक चांगले लिडर आहेत. तसेच शासकाच्या रूपात त्यांनी संपूर्ण संघ सोबत घेतला आणि चांगले काम केले.”

दरम्यान, असेही सांगितले जात आहे की, गांगुलींना अद्यक्षपद सोडल्यानंतर आयपीएल अध्यक्षपदाचा प्रस्ताव मिळाला होता. परंतु, त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. गांगुलींच्या कार्यकाळात भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक महत्वाच्या मालिका आणि सामने जिंकले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकदाच सांगतो! तिसऱ्यांदा ‘मंकडींग’चा शिकार होता होता वाचला बटलर, स्टार्कने दिली सक्त ताकीद
‘त्याचे खेळातील सातत्य पाहून मी प्रभावित झालो…’, भारतीय दिग्गजाकडून सॅमसनवर कौतुकाचा वर्षाव  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---