विराट कोहली हा आयपीएलमधील महान फलंदाज आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळणाऱ्या या स्टारच्या नावावर सर्वाधिक आयपीएल धावा करण्याचा विक्रम आहे. विराट 2008 पासून आरसीबीकडून खेळत आहे. कोहलीने आरसीबीचे नेतृत्वही केले आहे. मात्र, आरसीबीसाठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे संघाच्या नावावर आयपीएलचे एकही विजेतेपद नाही. आता आयपीएल 2025 मध्ये संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. दरम्यान याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली आगामी हंगामात संघाचा कर्णधार म्हणून खेळण्याची शक्यता आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीला आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सांभाळायचे आहे. अशा परिस्थितीत आरसीबी व्यवस्थापन पुन्हा त्याच्याकडे नेतृत्वाची कमान सोपवू शकते. पण अद्याप याबाबत अधिकृतपणे कोणतीही भूमिका समोर आलेली नाही. दिल्लीत जन्मलेल्या या दिग्गज क्रिकेटरची 2013 मध्ये आरसीबीच्या पूर्णवेळ कर्णधारपदी निवड झाली होती. परंतु आयपीएल 2022 च्या आधी त्याने एक मोठा निर्णय घेतला आणि या पदाचा राजीनामा दिला. मात्र, आता तीन वर्षांनंतर तो या भूमिकेत परत येऊ शकतो. अहवालातील खुलाशानंतर आरसीबीच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
विराट कोहलीने 2013 ते 2021 पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व केले. मात्र, संघासाठी एकही आयपीएल विजेतेपद मिळवण्यात त्याला यश आले नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना विराट कोहलीने कर्णधार म्हणून 143 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. यापैकी 66 वेळा सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. तर 70 सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याची विजयाची टक्केवारी 46.15 इतकी आहे.
🚨 REPORTS 🚨
VK to lead RCB in IPL 2025? 👀🧢
Reports suggest Virat Kohli is eager to captain Royal Challengers Bangalore again in IPL 2025, aiming to end the franchise’s long wait for a title 🏆🔴
RCB fans, is this the news you’ve been waiting for? 😁#CricketTwitter pic.twitter.com/GpoH5kE09a
— Sportskeeda (@Sportskeeda) October 29, 2024
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलच्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. 2016 मध्ये, विराटच्या नेतृत्वाखाली, संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु विजेतेपदाला मुकले होते. यापूर्वी 2009 आणि 2011 मध्ये बेंगळुरू संघाने फायनल खेळली होती. मात्र त्यांची निराशा झाली होती. गेल्या मोसमातही आरसीबीने चमकदार कामगिरी करत टॉप-4 मध्ये स्थान मिळवले होते. पण उपांत्य फेरीत पराभूत होऊन संघ बाहेर पडला होता.
हेही वाचा-
“भारताला हरवणे शक्य…”, मुंबई कसोटीपूर्वी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाची प्रतिकिया
टी20 मध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकाणारे फलंदाज (टाॅप-5)
चाहत्यांचा आनंद द्विगुणित..! दिवाळीत भारत-पाकिस्तानचा मोठा सामना, पाहा वेळापत्रक