---Advertisement---

दैदिप्यमान कारकिर्दीची अखेर! असगर अफगाणला मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’; पाहा भावनिक व्हिडिओ

On: सोमवार, नोव्हेंबर 1, 2021 1:58 AM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध नामिबिया असा खेळला गेला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नामिबियाचा ६२ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी राखली. अफगाणिस्तानचा दिग्गज फलंदाज व माजी कर्णधार असलेला असगर अफगाण हा या सामन्यानंतर निवृत्त झाला. त्याच्या निवृत्तीनंतर अफगाणिस्तान संघाने त्याला यथोचित मानसन्मान दिला. त्याचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे.

अफगाणने स्वीकारली निवृत्ती
अफगाणिस्तानसाठी १६ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर असगर अफगाण याने रविवारी सकाळी आपण निवृत्त होणार असल्याची घोषणा केली होती. आपल्या अखेरच्या सामन्यात तो मैदानावर फलंदाजीला आला असताना नामिबिया संघाने त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. त्याने आपल्या अखेरच्या सामन्यात २३ चेंडूंमध्ये ३१ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर तो बाद होऊन तंबूत परतत असताना त्याच्या सहकाऱ्यांनी देखील त्याला ड्रेसिंग रूमपर्यंत बॅट उंचावत ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये बसला असताना अफगाणला आपले अश्रू अनावर झाले. हा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला.

https://www.instagram.com/p/CVsgvA-JXw9/?utm_medium=copy_link

दैदिप्यमान राहिली कारकीर्द
असगर याने अफगानिस्तानसाठी तब्बल १६ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यादरम्यान त्याने ६ कसोटी, ११४ वनडे व ७४ टी२० सामने खेळले. यामध्ये त्याने अनुक्रमे ४४०, २४२४ व १३५१ धावा केल्या. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन शतके व २० अर्धशतके जमा आहेत. असगर अफगान हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हार्दिकच्या नावावर ‘मोठा’ विक्रम, यापूर्वी केवळ युवराज सिंगला जमलाय ‘असा’ पराक्रम

अरेरे! टी२० विश्वचषकाचा पहिलाच सामना खेळताना ईशान किशनचा नकोशा विक्रमाच्या यादीत समावेश

प्रथम फलंदाजी भोवली! टीम इंडियाच्या बाबतीत टी२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली ‘अशी’ गोष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---