---Advertisement---

अरेरे! टी२० विश्वचषकाचा पहिलाच सामना खेळताना ईशान किशनचा नकोशा विक्रमाच्या यादीत समावेश

On: सोमवार, नोव्हेंबर 1, 2021 1:43 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) एक महत्वपूर्ण सामना खेळाला गेला. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघ आमने सामने होते. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यात सुरुवातीला न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने घेतलेला हा निर्णय अगदी योग्य ठरला, कारण भारताला प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या करता आली नाही.

या सामन्यासाठी ईशान किशनला भारतीय संघात संधी दिली गेली होती, पण तो या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. त्याला या सामन्यात दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.

न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना ईशानसाठी टी२० विश्वचषकातील पदार्पण सामना ठरला, पण त्याला या सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. ईशानने या सामन्यात भारतासाठी सलामीवीराची भूमिका पार पडली. त्याने डावाची सुरुवात करत आठ चेंडूंचा सामना केला आणि अवघ्या चार धावा करून बाद झाला. ईशान बाद झाल्यानंतर एकापाठोपाठ एक भारतीय खेळाडू बाद झाले आणि संघ मर्यादित २० षटकांमध्ये अवघ्या ११० धावा करू शकला.

ईशानला त्याच्या टी-२० विश्वचषकातील पदार्पण सामन्यात दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही, पण तो असा पहिला भारतीय खेळाडू नाही. यापूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यालाही ईशानप्रमाणेच त्याच्या टी-२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच २०१६ मध्ये दोन आकडी धावसंख्या करता आली नव्हती. या यादीत सलामीवीर केएल राहुलचाही समावेश आहे. राहुलने त्याचे टी-२० विश्वचषकातील पदार्पण याचवर्षी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केले होते. त्याने या सामन्यात अवघ्या तीन धावा केल्या होत्या. आता या यादीत ईशानचा नव्याने समावेश झाला आहे.

दरम्यान, सामन्यात नाणेफेक गमावून भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. संघाने मर्यादित २० षटकांमध्ये सात विकेट्सच्या नुकसानावर ११० धावा केल्या. यामध्ये रवींद्र जडेजाने डावाच्या अंतिम टप्प्यात १९ चेंडूत सर्वाधिक २६ धावांची नाबाद खेळी केली. त्यानंतर न्यूझीलंडने १४.३ षटकात १११ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि सामना जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या –

प्रथम फलंदाजी भोवली! टीम इंडियाच्या बाबतीत टी२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली ‘अशी’ गोष्ट

आसिफच्या आयुष्यातील सर्वात दु:खद घटना; २ वर्षाच्या लाडक्या लेकीचा झाला होता कँसरने मृत्यू, आजही…

वचन पाळले! चेन्नई सुपर किंग्सकडून ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राचा सन्मान, एक कोटी रुपयांसह दिली खास जर्सी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---