सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ऍशेस मालिका (ashes series) खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात पराभव पत्करल्यानंतर अखेर चौथा सामना इंग्लंडने अनिर्णीत केला. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या डावात इंग्लंडपुढे विजयासाठी ३८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, इंग्लंडला ते गाठता आले नाही. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन गोलंदाज इंग्लंडला सर्वबाद देखील करू शकले नाहीत. परिणामी, चौथा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ (steve smith) याने चौथ्या कसोटी सामन्यात एका खास विक्रमाची नोंद केली.
स्मिथने चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात अर्धशतक पूर्ण केले आणि सोबतच नवीन विक्रमही नावावर केला. स्मिथने सामन्याच्या पहिल्या डावात १४१ चेंडूत ६७ धावांची खेळी केली, यामध्ये त्याच्या पाच चौकारांचा समावेश होता. या अर्धशतकी खेळीनंतर स्मिथ एखाद्या स्टेडियमवर सर्वात कमी डावांममध्ये १० वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू ठरला आहे. चौथा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळला गेला. स्मिथने आतापर्यंत सिडनीमध्ये खेळलेल्या ९ कसोटी सामन्यांतील १३ डावांमध्ये १० वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची खेळी केली.
सिडनीमधील स्मिथच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने याठिकाणी तीन शतके आणि ९ अर्धशतके ठोकली आहेत. एका मैदानावर कमीत कमी डावांमध्ये १० वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये यापूर्वी ग्रेग चॅपेल, हाशिम आमला आणि मिस्बाह उल हक या तिघांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. या तिन्ही खेळाडूंनी एका मैदानावरील त्यांच्या १४ पैकी १० डावांमध्ये ५० पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे. चॅपल यांनी हा विक्रम मेलबर्मध्ये केला आहे. आमलाने सेंचुरियनमध्ये, तर मिस्बाहने अबूधाबीमध्ये हा विक्रम केला होता. स्मिथने सिडनीमध्ये त्याचे शेवटची अर्धशतकी खेळी केली आणि या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
Fastest to 10 Test fifty-plus scores at a ground (by innings):
13 – Steve Smith 🇦🇺 at Sydney
14 – Greg Chappell 🇦🇺 at Melbourne
14 – Hashim Amla 🇿🇦 at Centurion
14 – Misbah-ul-Haq 🇵🇰 at Abu Dhabi#Ashes #AUSvENG— Kausthub Gudipati (@kaustats) January 6, 2022
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या ऍशेस मालिकेचा विचार केला, तर स्मिथने आतापर्यंत खेळलेल्या ५ डावांमध्ये १९४ धावा केल्या. यामध्ये त्याने सर्वाधिक ९३ धावांची खेळी देखील केली. ऍशेस मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे आणि त्यांचा संघ सध्या ३-० अशी आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या –
Video: स्मिथमध्ये पुन्हा दिसली ‘वॉर्न’ची झलक, इंग्लंडच्या लीचला असं पकडलं फिरकीच्या जाळ्यात
सिडनी कसोटी अनिर्णित राखण्याच्या आनंदावर विरजण! पाचव्या कसोटीतून इंग्लंडचा ‘मॅचविनर’ बाहेर
PHOTOS: टेन्शन म्हणजे काय असते? स्टोक्सला विचारा? पाहा व्हायरल फोटो
व्हिडिओ पाहा –