ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या खेळल्या जात असलेल्या ऍशेस मालिकेवर (ashes series) पहिल्यापासूनच कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचे सावट होते. अशातच दुसऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला कोरोनाचे संक्रमण झाले. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोरोनासंदर्भात काही कडक निर्बंध लादले. त्यावेळी कमिन्सव्यतिरिक्त संघातील दुसऱ्या कोणत्या खेळाडूला कोरोनाचे संक्कमण झाले नव्हते, परंतु आता पुन्हा एकदा दोन्ही संघांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. यावेळी इंग्लंडचा डेविड मलान (dawid malan) कोरोना संक्रमित व्यक्तिच्या संपर्कात आला आहे आणि यामुळे ऍशेस मालिकेवर कोरोनाचे सावट येऊ शकते.
सध्या ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सिडनी आणि ब्रिस्बेनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय प्रकारे वाढत आहे. एडिलेमध्ये सुरू असेलल्या दुसऱ्या ऍशेस सामन्यात शनिवारचा (१८ डिसेंबर) खेळ संपल्यानंतर इंग्लंड संघाच्या डेविड मलानने एका पत्रकाराला मुलाखत दिली, पण त्याला ही मुलाखत महागात पडण्याची शक्यता आहे. मलानने ज्या पत्रकाराला मुलाखत दिली, तो बीबीसी माध्यमासाठी काम करतो आणि आता हा पत्रकार कोरोना संक्रमित आढळल्याचे समोर आले आहे.
माध्यमांतील माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाचा पीटर लालेर शनिवारी कोरोना संक्रमित आढळला आहे. त्याने यापूर्वी डेविड मलानची मुलाखत घेतली होती. परंतु त्याने मुलाखत घेताना तोंडावर माक्स लावले होते आणि त्यामुळे मलानला संक्रमण होण्याची शक्यता कमी आहे.
या पत्रकाराव्यतिरिक्त ब्रॉडकास्ट टीममधील एका व्यक्तिला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्यांवर नजर ठेवून आहे.
ऍशेस मालिकेच्या सुरुवातीला पॅट कमिन्सला ऑस्ट्रेलिया संघाचा नवीन कसोटी कर्णधार नियुक्त केले गेले होते. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने पहिला कसोटी सामना जिंकला, पण दुसऱ्या सामन्यात त्याला सहभागी होता आले नाही. दुसऱ्या सामन्यापूर्वी कमिन्स कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला होता आणि स्वतः देखील संक्रमित आढळला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात स्टीव स्मिथकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर मायकल नेसरला कमिन्सच्या जागी संघात सामील केले गेले.
महत्वाच्या बातम्या –
बॅडमिंटनपटू श्रीकांतकडे इतिहास रचण्याची संधी! पाहा कोठे पाहता येणार विश्वविजेतेपदासाठीचा सामना
टीम इंडियासाठी ‘फायनल फ्रंटियर’ बनलाय दक्षिण आफ्रिका दौरा; यावेळी विजयाची सर्वाधिक संधी