---Advertisement---

थोडक्यात वाचले! जर कमिन्सने तो मेसेज पहिला असता तर स्टार्क-लायनचे काही खरे नव्हते

On: रविवार, डिसेंबर 19, 2021 8:41 AM
australia tst team
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (australia vs england) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ऍशेस (ashes series) मालिकेचा थरार सुरू आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारत ९ गडी राखून विजय मिळवला. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील ऑस्ट्रेलिया संघ विजयाच्या अगदी जवळ आहे. दरम्यान मिचेल स्टार्कने मोठा खुलासा केला आहे.(Mitchel Starc explains how a text message saved him from COVID 19)

मिचेल स्टार्कने ( Mitchel Starc) ऍशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. पहिल्या डावात त्याने ४ गडी बाद केले होते. तिसऱ्या दिवसाचा (१८ डिसेंबर) खेळ संपल्यानंतर मिचेल स्टार्कने सांगितले की, “आम्ही डिनरसाठी गेलो असता पॅट कमिन्स कोरोना संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता. मी आणि नॅथन लायन देखील तिथे गेलो होतो. परंतु त्याने माझा मेसेज पाहीला नव्हता, ज्यामुळे आम्ही बाहेरच होतो. बाहेर बसून आम्ही भाग्यशाली ठरलो. हॉटेलमध्ये आल्यानंतर पॅट कमिन्सला कोरोना संक्रमणाची चिंता होती. ज्यामुळे लायन देखील झोपला नव्हता.”

कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे पॅट कमिन्स दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. तर मिचेल स्टार्क आणि नाथन लायन एका मेसेजमुळे बचावले आहेत. परंतु ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांनी या दोन खेळाडुंबद्दल सांगण्यास नकार दिला होता. जर असे झाले असते तर ऑस्ट्रेलिया संघाच्या चिंतेत वाढ झाली असती. त्यानंतर पॅट कमिन्सला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली असून, स्टीव्ह स्मिथला कर्णधारपद देण्यात आले आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मिचेल स्टार्कने ४ गडी बाद केले होते. तर लायनने ३ गडी बाद केले. दोघांनी मिळून ७ गडी बाद केले होते. जर चुकून कमिन्सने तो मेसेज पाहिला असता तर या दोन्ही खेळाडूंना दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता आले नसते. सध्या ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत आहे.

महत्वाच्या बातम्या :

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आगळीक! खेळाडूंना केस कापण्यास दिली नाही परवानगी; वाचा सविस्तर

ऍडलेड कसोटीत ‘या’ कारणामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बांधले ब्लॅक आर्म बँड, कारण ऐकून कोसळेल रडू

न्यूझीलंडच्या ३४ वर्षीय गोलंदाजाने केली तरूणांना लाजवेल अशी कामगिरी; ३.५ षटकात मिळवले ‘इतके’ बळी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---