ऍशेस मालिकेतील (ashes series) पहिला सामना सध्या ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंड संघाने चांगले पुनरागमन केले. तत्पूर्वी, पहिल्या डावात इंग्लंड संघ १४७ धावांवर सर्वबाद झाला होता. आता दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दोन विकेट्सच्या नुकसानावर २२० धावा केल्या. ऑस्ट्रेलियापेक्षा संघ ५८ धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडचे दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन (james anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (stuart broad) या सामन्यात विश्रांतीवर आहेत, पण तरीही सध्या त्यांची चर्चा होत आहे.
अँडरसन आणि ब्रॉड सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळपट्टीवरील फलंदाजांसाठी पाणी घेऊन जाताना दिसले. ज्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोघांना पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांती दिली असली, तरी ते दुसऱ्या मार्गाने संघाचा मदतीसाठी पुढे आले आहेत. तिसऱ्या दिवशी कर्णधार जो रुट आणि डेविड मलान या दोघांनी इंग्लंडचा डाव सावरला आणि मोठी खेळी केली. या दोघा फलंदाजांसाठी अँडरसन आणि ब्रॉड जोडी पाणी घेऊन गेली होती. तसेच यावेळी त्याच्या हातात टॉवेल देखील होता. या दोन दिग्गज गोलंदाजांना हे काम करताना पाहिल्यानंतर चाहते त्यांचे कौतुक करत आहेत.
https://twitter.com/KathLoughnan/status/1469164247925985281?t=SHru_Oc7KYfuW2UbRlnk5w&s=19
https://twitter.com/M_Junaidd/status/1469297629741953026?t=FcOjwNX37xjIX-O3TmfdFQ&s=19
दरम्यान, कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात ४२५ धावा करून सर्वबाद झाला. त्यानंतर इंग्लंडला पुन्हा फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत २ बाद २७८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविड हेडने १४८ चेंडूत सर्वाधिक १५२ धावा केल्या. इंग्लंड संघाचे दोन्ही सलामीवीर रॉरी बर्न्स (१३) आणि हसीब हमीद (२७) दुसऱ्या डावात स्वस्तात तंबूत परतले.
Good start! 🙈 Surely we have to play frontline spinner. Or is Jack Leach going to be carrying drinks once again. 😡 Some tough calls to make. Not having Broad or Anderson in Ashes opener will be gamble.
— Andy Cleave (@CleaveO) December 6, 2021
कर्णधार जो रुट फलंदाजीसाठी आला तेव्हा, डेविड मलान खेळपट्टीवर उपस्थित होता. तेव्हा संघाची धावसंख्या २ बाद ६१ होती. त्यानंतर रुट आणि मलान या दोघांनी इंग्लंडचा डाव सावरला. मलानने तिसऱ्या दिवशी १७७ चेंडूत नाबाद ८० धावा केल्या असून, यामध्ये त्याच्या १० चौकारांचा समावेश आहे. तसेच रुटने १५८ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या –
विक्रमवीर रूट!! गॅबा कसोटीत अर्धशतकी खेळी करत माजी इंग्लिश कर्णधारासह पाँटिंगला पछाडले