---Advertisement---

व्हिडिओ: मुलाखतीत व्यस्त असलेल्या वुडसोबत स्टोक्सची मस्ती; चिडून गोलंदाज म्हणाला, ‘बंद कर ते’ 

On: सोमवार, डिसेंबर 27, 2021 4:15 PM
Mark-Wood-And-Ben-Stokes Video
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात मेलबर्न येथे बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day test) सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (२७ डिसेंबर) इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला २६७ धावांवर रोखले आहे. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने १८५ धावा केल्या होत्या. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड (Mark Wood) मुलाखतीत व्यस्त असताना त्याचा संघ सहकारी आणि अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) त्याला सतवताना (Ben Stokes Disturbs Mark Wood) दिसला आहे. याचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

त्याचे झाले असे की, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू असताना मध्ये ड्रिंक्स ब्रेक झाला. या ब्रेकदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ७१ धावांवर २ विकेट्स घेणाऱ्या वुडची एक समालोचक मुलाखत घेत होते. लाईव्ह चालू असलेल्या या मुलाखतीत वुड समालोचकांच्या प्रश्नांची खूप गांभीर्याने उत्तरे देत होता. यावेळी त्याच्यामागे थांबलेले जॉनी बेयरस्टो आणि इतर खेळाडू थंडपेय पिण्यात व्यस्त होते. इतक्यात तिथे असलेल्या स्टोक्सला मस्ती सुचली.

स्टोक्सने जवळील एक पाण्याची बाटली उचलली आणि त्याचे झाकण काढून मुलाखतीत व्यस्त असलेल्या वुडच्या अंगावर त्या बाटलीतले पाणी फेकू लागला. त्याने २-३ वेळा वुडचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. परंतु वुडचे त्याकडे लक्ष गेले नाही. हे पाहून स्टोक्स थोडा पुढे सरकला आणि पुन्हा जोराने वुडच्या अंगावर पाणी फेकले. यावर वुडचे लक्ष स्टोक्सकडे वेधले गेले.

यावर चटकन प्रतिक्रिया देताना वुड स्टोक्सला म्हणाला की, ‘बंद कर ते.’ वुडच्या तोंडून निघालेले हे उद्गार ऐकून मुलाखत घेत असलेले समालोचक मोठमोठ्याने हसू लागले.

https://twitter.com/cricketcomau/status/1475315847606329346?s=20

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ क्लिप ट्वीटरवर पोस्ट करत मजेशीर कॅप्शन दिले आहे. “बेन स्टोक्सने शेवटी मार्क वुडची एकाग्रता तोडली, असे त्यांनी लिहिले आहे. हा गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने या सामन्यात १८५ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून एकटा कर्णधार जो रूट अर्धशतक करू शकला होता. प्रत्युत्तरात सलामीवीर मार्कस हॅरिसच्या ७६ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ २६७ धावांपर्यंत मजल मारू शकला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

उन्मुक्त चंदनंतर आणखी एका खेळाडूने निवृत्ती जाहीर करत सोडला देश; आता अमेरिकेकडून खेळणार क्रिकेट

Ashes: मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावातही इंग्लंडची खराब सुरुवात; दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत

SAvsIND, 1st Test, Live: दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच पावसाचा अडथळा; खेळ उशीराने होणार सुरू

हेही पाहा-

बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही... | What is Boxing Day Test? History of Boxing Day

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---