ऍशेस 2023 मालिकेतील तिसरा सामना लीड्स, हेडिंग्ले येथे पार पडला. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहणाऱ्या इंग्लंड संघाने तिसऱ्या सामन्यात मात्र दमदार पुनरागमन केले. हा सामना इंग्लंडने 3 विकेट्सने आपल्या नावावर केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सलग तिसरा सामना जिंकून मालिका नावावर करण्यात अपयश आले. तिसरा कसोटी हारूनही ऑस्ट्रेलिया मालिकेत 2-1ने आघाडीवर आहे. इंग्लंडसाठी तिसऱ्या कसोटीत मार्क वूड याने शानदार प्रदर्शन केले. त्याच्या जोरावर संघाने शानदार विजय मिळवण्यात यशस्वी झाला. असे असले, तरीही कर्णधार बेन स्टोक्स याने या सामन्यात शानदार विक्रम केला. यावेळी बेन स्टोक्सने एमएस धोनीचा विक्रम मोडला. चला तर, त्याविषयी जाणून घेऊयात…
स्टोक्सने मोडला विक्रम
ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडला तिसऱ्या कसोटीत विजयासाठी 251 धावांचे आव्हान दिले होते. यावेळी इंग्लंडने 7 विकेट्स गमावत 254 धावा केल्या आणि आव्हान पार केले. यासोबतच बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने पाचव्यांदा कसोटीत 250 किंवा त्याहून अधिक धावांचे आव्हान यशस्वीरीत्या पार केले. दुसरीकडे, एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाखाली भारताने 4 वेळा कसोटीत 250 किंवा त्याहून अधिक धावांचे आव्हान पार केले होते.
कसोटीत सर्वाधिक वेळा 250 धावांचे आव्हान पार करणारे कर्णधार
5 वेळा- बेन स्टोक्स*
4 वेळा- एमएस धोनी
3 वेळा- ब्रायन लारा
3 वेळा- रिकी पाँटिंग
स्टोक्सची कमाल
स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ कसोटीत चांगली कामगिरी करत आहे. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमकतेसोबत खेळण्यावर भर दिला आहे. स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 17 कसोटी सामन्यांपैकी 12 सामने जिंकले आहेत. तसेच, 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मागील वर्षी स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध 277 धावा, 299 धावा, 296 धावांचे आव्हान पार केले होते. याव्यतिरिक्त इंग्लंडने भारताविरुद्ध जुलैमध्ये एजबॅस्टन येथे 378 धावांचे आव्हानही पार केले होते.
तिसऱ्या कसोटीत चमकला वूड
तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने मार्क वूड (Mark Wood) याने चेंडू आणि बॅट अशा दोन्ही विभागात कमाल प्रदर्शन केले. त्याने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. तसेच, दुसऱ्या डावातही 2 विकेट्सची कमाई केली. त्याच्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात मोठे आव्हान उभे करू शकला नाही. तसेच, फलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात 24 आणि दुसऱ्या डावात महत्त्वपूर्ण 16 धावांचे योगदान दिले. (ashes 2023 ben stokes break ms dhoni captaincy record most times chase 250 plus target in test cricket history)
महत्वाच्या बातम्या-
तब्बल ‘एवढ्या’ देशांचा दौरा करणार वर्ल्डकप ट्रॉफी, पँगाँग लेक अन् शांती स्तूपला दिली भेट; पाहा व्हिडिओ
असं कोण बाद होतं! सहकाऱ्याने अर्धशतक ठोकताच फलंदाज विचित्र पद्धतीने Run Out, सतत पाहिला जातोय Video