एजबस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एकूण 43 षटके कमी टाकली गेली. बुधवारी (16 जून) ऍशेस 2023 हंगामचा सुरुवात झाली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पण रविवारी (18 जून) सामना रंगात असताना पावसामुळे खेळाडू आणि चाहत्यांची निराशा झाली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटची इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात 2 बाद 28 धावा केल्या असून संघ 35 धावांनी आघाडीवर आहे.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरी यांनी केली. त्यावेळी ऑस्ट्रलियची धावसंख्या 5 बाद 311 होती. दुसऱ्या दिवसाखेर ख्वाज 126, तर कॅरी 52 धावांसह खेळपट्टीवर कायम होते. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने ऍलेक्स कॅरीच्या रुपात तिसऱ्या दिवसाची पहिली विकेट घेतली. अँडरसची या सामन्यातील ही पहिलीच विकेट ठरली. कॅरीने 66 धावांची खेळी केली, तर ख्वाजा 141 धावांपर्यंत खेळपट्टीवर टिकला. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्याच डावात आघाडी मिळवेल असे वाटत असतानाच इंग्लंडच्या गोलंदाजांनी जोरदार पुरनरागमन केले. संघाची धावसंख्या 372 असताना ख्वाजाने विकेट गमावली. त्यानंतर संघाची धावसंख्या 386 असताना ऑस्ट्रेलियाने पुढच्या तीन विकेट्सही गमावल्या. पहिल्या डावात इंग्लंडसाठी स्टुअर्ट ब्रॉड आणि ओली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. मोईन अलीने दोन, तर बेन स्टोक्स आणि जेम्स अँडरसन यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
पहिल्या डावानंतर इंग्लंड संघ 7 धावांच्या आघाडीवर होता. दुसऱ्यांदा फलंदाजीला आल्यानंतर इंग्लंडला चांगली सुरुवात मिळवून देण्याच्या जबाबदारी सलामीवीर झॅक क्राउली आणि बेन डकेथ यांच्यावर होती. यांनी पण त्यांनी अनुक्रमे 7 आणि 19 धावांची खेळी करून विकेट गमावल्या. ऑस्ट्रेलियन संघाला चांगली सुरुवात मिळाली असली, तरी पावसामुळे खोलंबा झाला. सातव्या षटकात पाऊस आल्यानंतर सामना जवळपास एक तास खेळ थांबवला गेला. त्यानंतर कसाबसा खेळ सुरू झाला आणि ऑस्ट्रेलियाला दोन विकेट्स मिळाल्या. खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाला फायदा मिळत असतानाच 11 व्या षटकात पुन्हा पावसाने मैदानात हजेरी लावली आणि सामना दिवसाचा खेळ अर्थ्यात थांबवावा लागला. सध्या इंग्लंड संघ 35 धावांनी आघाडीवर आहे. सामना निकाली निघण्यासाठी शेवटच्या दोन दिवसांमध्ये एकूण 18 विकेट्स गेल्या पाहिजेत. चौथा दिवस ऑस्ट्रेलियासाठी महत्वाचा ठरणार आहे. (Ashes 2023 ENG vs AUS On the third day of the Edgbaston Test, play was incomplete due to rain)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: भारताने उंचावला इंटरकॉन्टिंनेंटल फुटबॉल कप, कॅप्टन छेत्री ठरला नायक
“फक्त आक्रमकता असून चालत नाही, माझ्या संघासारखे…” गांगुलीचे टीम इंडियावर टीकास्त्र






