---Advertisement---

ऍशेसच्या चौथ्या सामन्यासाठी इंग्लंडने घ्यावी टीम इंडियाकडून प्रेरणा, माजी दिग्गजाचा सल्ला

On: रविवार, जानेवारी 9, 2022 9:33 AM
ENGLAND-TEST-TEAM
---Advertisement---

ऍशेस मालिकेतील (ashes series) सिडने कसोटी सामन्यात इंग्लंड संघासमोर ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ३८८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. शेवटच्या डावात इंग्लंडने एकही विकेट न गमावता ३० धावा केल्या आहेत. विजयासाठी इंग्लंडला अखेरच्या दिवशी ३५८ धावांची आवश्यकता आहे. अशात ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज मायकल हसी (Michael Hussey) याने या सामन्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघाने मागच्या वर्षी याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना अनिर्णयत केला होता, हसीच्या मते इंग्लंड संघही भारताकडून प्रेरणा घेऊन हा सामना अनिर्णीत करू शकतो.

क्रिकबजसोबत बोलताना हसी म्हणाला की, ‘मागच्या वर्षी भारतीय संघाला सर्वांनी राईट ऑफ केले होते. तुम्हाला आता माहीत नाही की, काय होऊ शकेत आणि कसोटी क्रिकेटच्या याच गोष्टीवर सर्वजण प्रेम करतात. भारतीय संघाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते, पण ते उत्साहाने खेळले आणि ही गोष्ट इंग्लंड संघाला या सामन्यात कामी येऊ शकते.’

हसीच्या मते संघात स्वतःच्या स्थानासाठी लढण्याचा खेळाडूंचा दृढ संकल्प आणि काही अन्य गोष्टी मिळून इंग्लंडला या सामन्यात पराभवापासून वाचण्याच्या प्रयत्नासाठी प्रेरणा म्हणून काम करू शकतात. हसी म्हणाला की इंग्लंडकडे सामना अनिर्णीत करण्यासाठी जास्त संधी आहे.

टोकियो ऑलिम्पिक... भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा | India at Tokyo Olympics 2020

इंग्लंड या सामन्यात विजय मिळवेल, याविषही मात्र हसी जास्त काही बोलला नाही. लक्ष्य थोडे अवघड आहे, पण अशक्य म्हटले जाऊ शकत नाही. आता इंग्लंड संघाचे सर्व फलंदाज सुरक्षित आहेत. अशात पहिल्या सत्रात जोखीम घेण्याची काही संधी त्यांच्याकडे असतील. परंतु सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाची शक्यता सांगितली गेली आहे. अशात सामना अनिर्णीत होण्याची शक्यता जास्त आहे, असे तो पुढे म्हणाला.

दरम्यान, ऍशेस मालिकेतील इंग्लंडच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर ते पहिल्या तीन सामन्यांमध्ये निराशाजनक राहिले आहे. पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवला आणि ३-० अशी विजयी आघाडी देखील घेतली. आता इंग्लंडला स्वतःची लाज राखण्यासाठी राहिलेल्या दोन सामने किमान अनिर्णीत तरी करावे लागतील. सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंड संघ कोणत्या रणनीतीसह मैदानात उतरतो हे देखील पाहावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

पटना पायरेट्सची रोमहर्षक सामन्यात गुजरातवर मात; एका गुणाने साजरा केला विजय

“… म्हणून मला आरसीबीने रिटेन केले नाही”, स्वतः हर्षल पटेलने पुढे येत सांगितले कारण

‘हे’ दोन खेळाडू अजूनही राहाणार टीम इंडियात कायम, मुख्य प्रशिक्षक द्रविडचे संकेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---