इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून (दि. 27 जुलै) लंडन येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर ऍशेस 2023 मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंड संघाने यासाठी एक दिवस आधीच प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, या संघात खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यालाही जागा देण्यात आली आहे. खराब फॉर्ममध्ये असूनही अँडरसनला संधी दिल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशात इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने जेम्स अँडरसन याला पाठिंबा देत टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
अँडरसनला बेन स्टोक्सचा पाठिंबा
टीकाकारांच्या वेढलेल्या जेम्स अँडरसन (James Anderson) याला कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने भक्कम पाठिंबा दर्शवला आहे. स्टोक्स म्हणाला आहे की, “अँडरसनने अद्याप निवृत्ती घेतली नाहीये. संघासाठी त्याला भविष्यात भूमिका बजावायची आहे. तो महान वेगवान गोलंदाज आहे. त्याचा प्रभाव आहे आणि त्याला विकेट घेणे माहिती आहे. चालू मालिकेत त्याचे प्रदर्शन अपेक्षेनुसार राहिले नाही, पण तो शानदार प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.”
Jimmy Anderson = 🐐 #EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/5vjYxB9fVp
— England Cricket (@englandcricket) July 26, 2023
ऍशेस मालिकेत फ्लॉप ठरला जेम्स अँडरसन
खरं तर, जेम्स अँडरसन चालू ऍशेस 2023 (Ashes 2023) मालिकेत खास कामगिरी करू शकला नाही. मालिकेतील 4 सामने संपल्यानंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो 12व्या स्थानी आहे. त्याने 3 कसोटी सामन्यातील 6 डावात फक्त 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला सलग मिळत असलेल्या संधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
अँडरसनची कसोटी कारकीर्द
जेम्स अँडरसन याच्या कसोटी कारकीर्दीवर नजर टाकली, तर त्याने आतापर्यंत इंग्लंडकडून 182 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 2.79च्या सरासरीने 689 विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानी स्टुअर्ट ब्रॉड असून त्याच्या नावावर 167 सामन्यात 600 विकेट्सची नोंद आहे. (ashes series 5th test eng vs aus captain ben stokes full supported pacer james anderson)
महत्त्वाच्या बातम्या-
हे तर पाहिलंच पाहिजे! Vintage Rolls Royce चालवताना धोनी कॅमेऱ्यात कैद, रांचीतील व्हिडिओ जगभरात व्हायरल
विरोधी संघांनो सावधान! वनडे विश्वचषकात खेळण्यासाठी इंग्लंडचा जबरदस्त खेळाडू फिट, लगेच वाचा