यंदाच्या इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या अॅशेस मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मागील मालिका इंग्लंड मध्ये खेळवण्यात आली होती. त्यामुळे यंदा ही मालिका ऑस्ट्रेलियात होणार आहे. ९ डिसेंबर पासून अॅशेसला सुरुवात होईल.
या मालिकेचा अंतिम सामना पर्थच्या स्टेडियमवर खेळवला जाईल. मात्र यामुळे १९९५ नंतर पहिल्यांदाच अॅशेस मालिकेचा ऑस्ट्रेलियातील अंतिम सामना सिडनी व्यतिरिक्त इतरत्र खेळवला जाईल. मात्र अद्याप पूर्ण वेळापत्रक जाहीर झाले क्रिकेट ऑस्ट्रेलिया येत्या आठवड्यात त्याची घोषणा करेल.
दिवस-रात्र कसोटीचाही समावेश
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अॅशेस मालिकेची सुरुवात ९ डिसेंबर पासून होईल. पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवला जाईल. यानंतर दुसरा सामना दिवस-रात्र स्वरूपात खेळवला जाऊ शकतो. पिंक बॉलने खेळवला जाणारा हा सामना एडिलेडच्या मैदानावर होईल, अशी शक्यता आहे. अर्थात या तारखांवर शिक्कामोर्तब होणे, अद्याप बाकी आहे. याशिवाय मेलबर्न आणि सिडनीला अनुक्रमे बॉक्सिंग डे आणि न्यू ईयर सामन्याचे आयोजन दिले जाईल, अशी शक्यता आहे. तर अंतिम सामना पर्थच्या मैदानावर १४ जानेवारी पासून खेळवला जाईल.
ऑस्ट्रेलिया करणार पूर्वतयारी
ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलिया आपल्या हंगामाची सुरुवात नोव्हेंबर महिन्यात करेल. नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात अफगानिस्तान विरूद्ध एका कसोटी सामन्याची मालिका खेळेल. हा सामना होबार्ट येथे आयोजित केला जाईल. इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलियासाठी हा सामना उपयुक्त असेल.
ऑस्ट्रेलियाकडे आहे अॅशेस
दरम्यान, मागील अॅशेस मालिका २-२ अशा बरोबरीत सुटली होती. त्यामुळे सद्यस्थितीत अॅशेस ऑस्ट्रेलियाकडेच आहे. याशिवाय गेल्या वर्षात ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात अॅशेस मालिकेत पराभूत झाला नाहिये. त्यामुळे आगामी मालिकेत देखील ऑस्ट्रेलियाचे पारडे काहीसे जड असेल. मात्र इंग्लंडचा संघ तुल्यबळ असल्याने चाहत्यांना रंगदार सामने पाहायला मिळण्याची आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ एक आंतरराष्ट्रीय सामना खेळूनही ठरला क्रिकेटर ऑफ द इयर, पाहा डोळे दिपवणारी आकडेवारी
धोनीचे आगमन ते आयपीएलला स्थगिती; चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहते झाले भावूक