इंडियन प्रीमियर लीगमधील 50 वा सामना शुक्रवारी (30 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झाला. या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला. या विजयासह राजस्थानच्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा कायम आहेत. मात्र, राजस्थान संघाने याआधीच प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं असतं, असा विश्वास माजी भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराला आहे. त्याने या संघासाठी काही योजनाही सुचवल्या आहेत.
फलंदाजीच्या क्रमात करावे बदल
माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आशिष नेहरा याने राजस्थान रॉयल्सचे जोरदार कौतुक केले आहे. नेहरा म्हणाला की, “राजस्थान संघाने गेल्या काही सामन्यांत जबरदस्त खेळ केला आहे. राजस्थान रॉयल्स संघ मुंबई इंडियन्स संघासारखा आहे. या संघाने फलंदाजीच्या क्रमात बदल केले आणि फलंदाजांचा योग्य वापर केला, तर संघ अधिक चांगली कामगिरी करू शकतो.”
…..तर प्ले ऑफमध्ये मिळवले असते स्थान
जोफ्रा आर्चर आणि जॉस बटलरबद्दल बोलताना नेहरा म्हणाला की, “संघाने जोफ्रा आर्चरचा योग्य वापर करावा. इतकेच नाही तर संघाने बटलरला सलामीवीर म्हणून पाठवायला हवे होते. जर संघाने काही बदल केले असते, तर याआधीच या संघाने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले असते.”
राजस्थान, पंजाब, कोलकाता प्ले ऑफच्या शर्यतीत कायम
गुणतालिकेत मुंबई इंडियन्स पहिल्या स्थानी आहे. आरसीबीचा संघ दुसर्या क्रमांकावर, तर दिल्ली कॅपिटल्स संघ तिसर्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ 12 सामन्यात 7-7 सामने जिंकून पहिल्या तीनमध्ये आहेत. त्याचबरोबर 13 सामन्यांनंतर पंजाब, राजस्थान आणि केकेआर संघ 12 गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत आहे. तथापि, पुढील सामने या तिन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-काय रे धवन! आधी ठोकली सलग दोन शतके; पण पुढे केला नकोसा विक्रम
-हा फलंदाज टिकला तर विजय पक्का! स्टीव्ह स्मिथने ‘या’ खेळाडूचे केले तोंडभरून कौतुक
-कमाल लाजवाब राहूल! आयपीएलमध्ये अनोखी कामगिरी करत विराट कोहलीच्या विक्रमाची केली बरोबरी
ट्रेंडिंग लेख-
-सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
-…आणि १५ वर्षांपूर्वी ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला
-IPL 2020: या ५ कारणांमुळे पंजाबचा विजयी रथ रोखण्यात राजस्थानला आले यश