---Advertisement---

150 किमी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या या युवा गोलंदाजाला अचानक टीम इंडियामध्ये संधी; नेमकं काय घडलं?

On: मंगळवार, जून 16, 2026 7:26 AM
---Advertisement---

राजस्थानकडून गुजरातसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात वेगवान गोलंदाज अशोक शर्माला मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे. रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेसाठी त्याची इंडिया ‘अ’ संघात निवड करण्यात आली आहे.

23 वर्षीय अशोक शर्माचा समावेश दुखापतग्रस्त युधवीर सिंहच्या जागी करण्यात आला आहे. तो मंगळवारी सकाळी कोलंबोकडे रवाना होणार असून त्यानंतर डांबुलामध्ये संघासोबत जोडला जाईल. इंडिया ‘ए’, श्रीलंका ‘ए’ आणि अफगाणिस्तान ‘ए’ यांच्यात ही तिरंगी मालिका खेळली जात आहे.

तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील इंडिया ‘ए’ संघाला सोमवारी यजमान श्रीलंका ‘अ’ विरुद्ध निसटता पराभव स्वीकारावा लागला. आता 17 जून रोजी अफगाणिस्तान ‘ए’ विरुद्धचा सामना संघासाठी ‘करो किंवा मरो’ असा असणार आहे.

अशोक शर्माने आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने सहा सामन्यांत सहा विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या कामगिरीवर प्रभावित होऊन गुजरात टायटन्सने त्याला लिलावात 90 लाख रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले होते.

ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करणारा अशोक त्याच अॅक्शनमधून ताशी 115 किमी वेगाची स्लोअर बॉल टाकण्याची क्षमता देखील ठेवतो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 22 विकेट्स घेत त्याने 11 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आणि स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला.

अशोकला 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने 55 लाख रुपयांना पहिला आयपीएल करार दिला होता. त्यानंतर त्याला रिलीज करण्यात आले. तो राजस्थान रॉयल्ससोबत एका हंगामात नेट गोलंदाज म्हणूनही राहिला होता. 2025 च्या मेगा लिलावात राजस्थानने त्याला 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत घेतले, मात्र एकही सामना न खेळवता नंतर संघातून मुक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---