---Advertisement---

आशुतोष शर्मा म्हणजे ‘तबाही’ तुफानी खेळीनंतर मोठा खुलासा

On: मंगळवार, मार्च 25, 2025 1:08 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघामध्ये सोमवारी 24 मार्च रोजी खेळला गेला. या सामन्यात लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करत 209 धावसंख्या केली. नंतर धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली ज्यामुळे दिल्ली हा सामना पराभूत होईल असेच सर्वांना वाटत होते. पण दिल्लीसाठी आशुतोषने आक्रमक खेळी केली त्याने 31 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या आणि पूर्ण सामना फिरवला. या खेळीसाठी त्याला सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला. सामन्यानंतर आशुतोषने सांगितले आहे की एवढ्या दबावामध्ये सुद्धा त्याने प्रभावी कामगिरी करत संघाला विजय कसा मिळवून दिला, जाणून घेऊया तो काय म्हणाला

आशुतोष शर्माने प्रेझेंटेशनच्या वेळेस त्याच्या दमदार खेळीवर भाष्य करत म्हटले की, मी मागच्या हंगामात कितीतरी वेळा सामन्याचा शेवट करायला राहून गेलो. मी पूर्ण वर्ष माझ्या खेळाच्या प्रदर्शनावर काम केले आहे. मला विश्वास होता की, जर मी शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहिलो तर काहीही शक्य आहे. त्याने विप्राज निगमचे कौतुक केले तो म्हणाला मी त्याला सातत्याने मोठे शॉट खेळण्यासाठी सांगितले. तो एवढ्या दबावामध्ये सुद्धा शांत स्वभावाने खेळत होता, तसेच तो म्हणाला मी सामनावीर हा अवॉर्ड माझे आदर्श शिखर धवन यांना समर्पित करतो.

आशुतोष शर्माने सामन्यादरम्यान 31 चेंडूत 66 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्स संघाचा 15 व्या षटकात तेव्हा स्कोर 6 खेळाडू बाद होऊन 148 धावा होता. तोपर्यंत आशुतोष शर्माने 20 चेंडूत 20च धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने त्याचा बॅटमध्ये आणि त्याचा खेळी मध्ये असा बदल केला आणि वेगळ्या अंदाजात सामना पलटवला. शेवटच्या 11 चेंडूंमध्ये त्याने 46 धावा केल्या त्यामध्ये 8 बाउंड्री घेतल्या. ज्यामध्ये 5 षटकार आणि 3 चौकार सामील आहेत. शेवटच्या षटकांमध्ये त्याने शहबाज अहमदच्या चेंडूवर समोरच्या दिशेने षटकार मारत दिल्ली कॅपिटल्सला जोरदार विजय मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---