---Advertisement---

दक्षिण अफ्रिकेचा ‘हा’ दिग्गज टी२० विश्वचषकापर्यंत राहाणार बांगलादेशच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी कायम?

On: मंगळवार, जुलै 27, 2021 6:39 PM
---Advertisement---

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ( BCB ) सांगितले की दक्षिण अफ्रिकेचे माजी फलंदाज एश्वेल प्रिंस यांचा फलंदाजी प्रशिक्षकाचा करार या वर्षी होण्याऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत वाढविण्यात आलेला आहे. प्रिंस यांना सुरूवातीला फक्त बांगलादेशच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी घेण्यात आलं होतं. त्यांचा हा करार रविवारी संपणार होता.

इएसपीएनने दिलेल्या वृत्तानुसार बीसीबीचे क्रिकेट ऑपरेशन्सचे अध्यक्ष अकरम खानने सांगितले की आम्ही सुरुवातीला त्यांची झिम्बाब्वे दौऱ्याच्या मालिकेसाठी निवड केली होती. पण टी-२० विश्वचषकाच्या अगोदर प्रशिक्षक मिळणे आम्हाला अवघड होईल, यामुळे आम्ही त्याचं थोडंस अभिप्राय घेतला आणि ते आमच्यासाठी सकारात्मक ठरलं. मला असं वाटतंय की आमच्या काही खेळाडूंनी खरोखरच चांगला खेळ केला, तर काही खेळाडूंनी सांगितलं की त्यांचा आमच्यावर पुर्ण विश्वास बसला आहे.’

‘ते त्यांच्या कामामुळे आनंदी आहे. यामुळे आम्ही त्यांच्या सोबत पुढे जाण्याची योजना आखत आहे. आम्ही या गोष्टीची पडताळणी करीत आहोत की ते आमच्या सोबत टी-२० विश्वचषकापर्यंत असतील की नाही. आम्ही पुढच्या आठवड्यादरम्यान त्यांना पुढे घ्यायचं का नाही त्यावर अंतिम निर्णय घेऊ.’

बांगलादेश संघासाठी पुढचा काही काळ व्यस्त राहणार
प्रिंस हे श्रीलंकेचे माजी फिरकीपटू रंगना हेराथ यांच्या सोबत बांगलादेश कोचिंग स्टाफमध्ये पण सहभागी झाले होते. प्रिंस यांची खरी परीक्षा ही ऑस्ट्रेलिया विरूद्ध ऑगस्टमध्ये होणाऱ्या टी२० मालिकेदरम्यान असेल. यानंतर न्यूजीलंड विरूद्ध पण बांगलादेश टी-२० मालिका खेळणार आहे. यानंतर ऑक्टोबर महिन्यात टी-२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.

झिम्बाब्वे विरूद्ध मालिकेमुळे बांगलादेशला आत्मविश्वास 
झिम्बाब्वे दौऱ्यावर बांगलादेश संघाने चांगला खेळ केला. एकमेव कसोटी सामन्यात विजयी झाल्यानंतर वनडे सीरीजमध्ये क्लीन स्वीप दिला आणि त्यानंतर पण टी-२० मालिकाही २-१ ने खिशात टाकली. अशावेळी बांगलादेश संघ मोठ्या आत्मविश्वासाने ऑस्ट्रेलिया विरूद्ध घरच्या मैदानात उतरेल.

तसेत ऑस्ट्रेलियाची कामगिरी मात्र वेस्टइंडिज विरूद्ध चांगली नव्हती. ऑस्ट्रेलियावर वेस्ट इंडिज दौऱ्यातील टी-२० मालिकेत १-४ अशा फरकाने पराभव स्विकारण्याची वेळ आली होती. बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ५ सामन्यांची टी२० मालिका ३ ऑगस्टपासून सुरु होणार असून ९ ऑगस्ट रोजी संपणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंडमध्ये कसोटीतही होणार का सूर्यकुमारचा ‘उदय’? ‘या’ ३ खेळाडूंच्या ऐवजी मिळू शकते ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी

‘हे’ ३ विकेटकीपर पंतसाठी आहेत धोक्याची घंटा! यष्टीपुढे अन् यष्टीमागे प्रदर्शनात आहेत त्याच्या बरोबरीचे

आक्रमक फलंदाजी बनलीय ‘या’ खेळाडूंची ओळख, वनडेत १२०पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने कुटल्यात धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---