---Advertisement---

इंग्लंडमध्ये कसोटीतही होणार का सूर्यकुमारचा ‘उदय’? ‘या’ ३ खेळाडूंच्या ऐवजी मिळू शकते ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी

On: मंगळवार, जुलै 27, 2021 8:41 PM
---Advertisement---

भारताचा कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला ४ ऑगस्ट पासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी २१ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यात सूर्यकुमार यादवचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्याला या दौऱ्यासाठी गेलेले ३ खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने संधी मिळाली आहे.

सूर्यकुमार यादवचा सध्याचा फॉर्म पाहता आणि संघातील काही खेळाडूंची कामगिरी पाहता सुर्यकुमार यादवला भारताकडून इंग्लंडविरुद्ध कसोटीत अंतिम ११ जणांच्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. जर सूर्यकुमार यादवला कसोटी सामन्यात खेळवायचे झाल्यास काही खेळाडूंच्या जागी तो खेळू शकतो, याचा या लेखातून आढावा घेऊ.

१) हनुमा विहारी – हनुमा विहारी गेल्या काही वर्षांपासून भारतीय कसोटी संघात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून कामगिरी करत होता. परंतु, गेल्या काही काळात म्हणावी अशी फलंदाजी हनुमा विहारीकडून झाली नाही. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यातील सुरूवातीचे काही सामने हनुमा विहरीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. यातही त्याची सुमार कामगिरी राहिल्यास त्याच्या जागी विराट कोहली आणि संघव्यवस्थापन सूर्यकुमार यादवला खेळवण्यासाठी विचार करु शकतात.

२) चेतेश्वर पुजारा – २०२० पासून पुजाराने २० डावात केवळ २६.३५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात देखील पुजाराने काही खास खेळी केली नाही, तसेच त्याची खेळण्याची गती देखील खूप संथ आहे. त्यामुळे पुजाराच्या संघातील स्थानावर आता प्रश्नचिन्ह उठवले जात आहेत. अशात पुजाराची इंग्लंड दौऱ्यात सुरूवातीच्या सामन्यातील कामगिरी अशीच असमाधानकारक राहिल्यास भारतीय संघव्यवस्थापन पुजारा ऐवजी सूर्यकुमार यादव याला संघात स्थान देऊ शकतात.

३) अजिंक्य रहाणे – भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा सुद्धा या यादीत समावेश आहे. रहाणेसुद्धा २०२० पासून २० डावात केवळ २८.१५ च्या सामान्य सरासरीने धावा केल्या आहेत. म्हणूनच रहाणेच्या संघातील स्थानावर चिंता व्यक्त केली जात आहे. रहाणेनीसुद्धा सुरुवातीच्या सामन्यात स्वतःला सिद्ध नाही केले, तर लवकरच त्यालाही खाली बसावे लागू शकते. याच्याआधीही दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रहाणेला उपकर्णधार असताना देखील संघातून डच्चू मिळाला आहे. म्हणून रहाणेसाठी या दौऱ्यातील सुरुवातीचे सामने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘हे’ ३ विकेटकीपर पंतसाठी आहेत धोक्याची घंटा! यष्टीपुढे अन् यष्टीमागे प्रदर्शनात आहेत त्याच्या बरोबरीचे

आक्रमक फलंदाजी बनलीय ‘या’ खेळाडूंची ओळख, वनडेत १२०पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने कुटल्यात धावा

टोकियो ऑलिंपिक: जय- पराजयाच्या मालिकेनंतर भारतीय खेळाडूंचे किती खेळातील आव्हान बाकी? जाणून घ्या एका क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---