भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी राहुल द्रविड आणि बाकी कोचिंग स्टाफला विश्रांती दिल्याने नाराजी व्यक्त केली होती. एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण, ऋषिकेश कानिटकर आणि साईराज बहुतुले हे द्रविद, विक्रम राठोड आणि पारस म्हाब्रे यांच्या जागेवर न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघासोबत रवाना झाले. यामुळेच नाराज होत शास्त्री यांनी खेळाडूंना विश्रांती ठिक, मात्र प्रशिक्षकांना का, असा प्रश्न निर्माण केला. त्यावर आर अश्विन याने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी पत्रकार परिषदेत म्हटले, “माझा ब्रेकवर विश्वास नाही. कारण मला संघाला समजून घ्यायचे आहे. तुम्हाला (प्रशिक्षकांना) आयपीएलच्या वेळी 2-3 महिन्यांचा ब्रेक मिळतो मग अतिरिक्त ब्रेकची काय आवश्यकता. प्रशिक्षकाने संघासोबत असे गरजेचे आहे.”
भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandra Ashwin) याने राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा बचाव केला. तसेच त्याने विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा इत्यादी यांच्याबरोबर कोचिंग स्टाफला ब्रेकची आवश्यकता का हे पण स्पष्ट केले आहे.
अश्विन म्हणाला, “टी20 विश्वचषकासाठी द्रविडबरोबर अन्य कोचिंग स्टाफने खूप मेहनत घेतली. त्यांनी कशाप्रकारच्या योजना आखल्या हे सर्व मी जवळून पाहिले आहे. यामुळे त्यांना शारिरीक ब्रेकबरोबरच मानसिक आरामाचीही आवश्यकता आहे. न्यूझीलंडचा दौरा संपला की लगेच बांगलादेशचा दौरा आहे. त्यामुळेच लक्ष्मण यांना न्यूझीलंडच्या दौऱ्यावर पाठवले आहे.” त्याने हे सर्व आपल्या युट्युब चॅनलमध्ये स्पष्ट केले आहे.
द्रविड आणि बाकी नियमित कोचिंग स्टाफ बांगलादेशच्या दौऱ्यापासून संघाशी जोडले जाणार आहेत. यामध्ये वनडे आणि कसोटी मालिका खेळली जाणार असून 4 डिसेंबरपासून याची सुरूवात होणार आहे.
सध्या भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यात टी20 मालिका हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. यातील वेलिंग्टन येथे खेळला जाणारा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसरा सामना रविवारी (20 नोव्हेंबर) माउंट मौनेगुई येथे खेळला जाणार आहे. Ashwin came to the rescue of Rahul Dravid! said to Ravi Shastri, ‘How hard he worked for the T20 World Cup…’
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
या पाच पात्रता असतील तरच होता येणार टीम इंडियाचा नवा निवडकर्ता; बीसीसीआयने घातलीये अट
भारतीय मूळ असलेल्या ‘या’ मुलाला मिळाला न्यूझीलंडच्या विस्फोटक फलंदाजाचा ऑटोग्राफ, पाहा व्हिडिओ