---Advertisement---

“तो एक्स फॅक्टर ठरेल”, एकसाथ चार दिग्गजांनी वर्ल्डकपसाठी दिली तिलकला पसंती

---Advertisement---

हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यात टी-20 मालिका खेळत आहे. पण रोहित या मालिकेचा भाग नसल्यामुळे मायदेशात परतला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत तिलक वर्मा या युवा फलंदाजाला पदार्पणाची संधी मिळाली. आपल्या पहिल्या तीनही सामन्यात छाप पाडण्यात तो यशस्वी ठरला. त्यानंतर आता थेट आगामी विश्वचषकात त्याला भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर खेळवले जावे अशी मागणी जोर धरत आहे.

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मधील आपल्या दमदार खेळीच्या जोरावर तिलक वर्मा (Tilak Verma) याने भारतीय संघात स्थान मिळवले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला पदार्पणाची संधी देखील मिळाली. पहिल्या सामन्यात त्याने भारतीय संघासाठी सर्वाधिक 39 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अर्धशतक तर तिसऱ्या सामन्यात नाबाद 49 धावांची खेळी त्याने केली. त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या वनडे विश्वचषकासाठी त्याचा विचार व्हावा, अशी मागणी काही माजी भारतीय क्रिकेटपटूंनी केली.

निवड समितीचे माजी अध्यक्ष राहिलेल्या एमएसके प्रसाद, माजी सलामीवीर वसीम जाफर व माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांनी तो भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सोडवू शकतो असे म्हटले. याव्यतिरिक्त भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने देखील त्याला विश्वचषक संघात खेळवावे असा सल्ला दिला आहे.

आगामी आशिया चषक आणि वनडे विश्वचषकासाठी सर्व संघ तयारीला लागले आहेत. वनडे विश्वचषकाचे यजमानपद यावर्षी भारताकडे आहे. बीसीसीआय यासाठी कुठलीच कसर सोडताना दिसत नाहीये. आशिया चषकासाठी भारतीय संघाची संघनिवड पुढील आठवड्यात होऊ शकते.

(Ashwin Ojha Jaffer And MSK Prasad Said Tilak Varma Is Suitable For Number 4 For Team India In ODI World Cup)

महत्वाच्या बातम्या –
युवा फलंदाजाचा अश्विन आणि वसीम जाफरवर प्रभाव, दिग्गजांची विश्वचषकासाठी थेट निवडकर्त्यांकडे मागणी
बोल्टचे मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन! वाचा 11 महिन्यांनंतर देशासाठी खेळताना गोलंदाजाला काय वाटते

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---